Homeताज्या घडामोडीMaha Kumbh 2025 : 10 हजार कोटी कुठे गेले? मुलुंडच्या पोपटलालने प्रश्न...

Maha Kumbh 2025 : 10 हजार कोटी कुठे गेले? मुलुंडच्या पोपटलालने प्रश्न विचारावा; नाव न घेता राऊतांचा सोमय्यांना टोला

Subscribe

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज (28 जानेवारी) माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी प्रयागराज येथील कुंभ मेळ्यात घडलेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेवर भाष्य करत केंद्रीय मंत्र्यांसह भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली.

Sanjay Raut On kirit somaiya मुंबई : कुंभ मेळ्यासाठी देण्यात आलेले 10 हजार कोटींपेक्षा जास्त पैसे कुठे खर्च झाले, जर योग्य ठिकाणी पैसे खर्च केले असतील तर आज ही घटना का घडली? याप्रकरणी सदोष मनुष्य वदाचा गुन्हा कोणावर दाखल केला पाहिजे? यासाठी मुलुंडच्या पोपटलाल ने तिथे गेले पाहिजे. तसेच, प्रयागराज येथे जाऊन त्या पोपटलालने प्रश्न विचारला पाहिजे 10 हजार कोटी कुठे गेले, असे सवाल उपस्थित करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी नाव न घेता भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला. (Sanjay Raut On kirit somaiya Prayagraj kumbh Mela Narendra Modi And Amit Shah Sanjay Raut News In Marathi)

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज (28 जानेवारी) माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी प्रयागराज येथील कुंभ मेळ्यात घडलेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेवर भाष्य करत केंद्रीय मंत्र्यांसह भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली. त्यानुसार, “या कुंभ मेळ्यासाठी 10 हजार कोटींपेक्षा जास्तीचे बजेट देण्यात आले आहे. पण हे 10 हजार कोटी प्रत्यक्ष दिसत नाही. कोरोना काळातील महाराष्ट्रातील व्यवस्थेवर, खिचडी वाटपावर तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, पण कुंभ मेळ्यामध्ये 10 हजार कोटींपेक्षा जास्त दिलेले पैसे कुठे खर्च झाले? पैसे नक्की कुठे गेले? जर योग्य ठिकाणी पैसे खर्च केले असतील तर आज ही घटना का घडली. याप्रकरणी सदोष मनुष्य वदाचा गुन्हा कोणावर दाखल केला पाहिजे? यासाठी मुलुंडच्या पोपटलाल ने तिथे गेले पाहिजे. तसेच, प्रयागराज येथे जाऊन त्या पोपटलालने प्रश्न विचारला पाहिजे 10 हजार कोटी कुठे गेले, कोणत्या गंगेच्या प्रवाहात वाहून गेले, लोकं का मेली, हा सदोष मनुष्य वधाचा गुन्हा कोणावर दाखल करावा, याचं आम्हाला उत्तर द्या”, असं म्हणत संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यासह केंद्रीय मंत्र्यांवर निशाणा साधला.

राजकीय भांडवल करण्यासाठी कुंभ मेळ्याचं आजोजन – राऊत

“1954 साली प्रयागराज (तेव्हाचं हैदराबाद) येथे झालेला कुभमेळा यांनी पाहावा. स्वत: पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू भाविकांची सुविधा कशी झाली हे, पाहण्यासाठी दौऱ्यावर गेले होते. तसेच, तेव्हाचे मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत हे तिथे पूर्ण काळ उपस्थित होते, अशी माझी माहिती आहे. पण त्यावेळी राजकीय भांडवल करण्यासाठी त्यांनी कंभमेळा आयोजित केला नव्हता. त्यांनी धर्मशास्त्र यानुसार लोकांना सुविधा मिळाव्यात, त्यासाठी कुभ मेळ्याचं आयोजन केलं होतं”, असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर टीकेचे बाण सोडले.

‘श्रेयवादामुळे लोकांचे प्राण गेले’

“अखिलेश यादव हे तिथे असतात झालेला कुंभ मेळा अत्यंत चांगला होता, असे तिथे कुंभ स्नानासाठी येणारे भाविक सांगतात. विशेष म्हणजे या व्यवस्थापनेच्या विषयाच प्रयागराजमधील इतर पक्षांना विरोधी पक्षांनी एकत्र केलं असतं तर त्यांच्या अनुभवाचा फायदा झाला असता. पण श्रेयवाद… आम्हीच हिंदुत्ववादी…आम्हीच कुंभ आयोजित करू शकतो. या श्रेयवादातून लोकांना त्यांचे प्राण गमवावे लागले”, असा आरोप यावेळी संजय राऊत यांनी केला.


हेही वाचा – Sanjay Raut : पंतप्रधान, गृहमंत्र्यांच्या लक्ष ठेवण्याने 10 जणांचे प्राण परत येणार का? संजय राऊतांचा सवाल