“येत्या २६ तारखेला कळेल शिवसेना काय आहे”, संजय राऊतांचं चॅलेंज

येत्या २६ मार्च रोजी मालेगावात उद्धव ठाकरेंची सभा पार पडणार असून आता संजय राऊतांनी दंड थोपाटले आहेत. "येत्या २६ तारखेला शिवसेना काय आहे ते कळेल ", असं म्हणत संजय राऊतांनी थेट चॅलेंज दिलंय.

sanjay raut

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच राज्याचा दौरा करणार आहेत. काही विभागांमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा होत आहे. नुकतीच कोकणातील खेड येथील सभा पार पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांची दुसरी सभा ही उत्तर महाराष्ट्रात होणार आहे. त्यासाठी मालेगाव हे शहर निवडण्यात आले आहे. येत्या २६ मार्च रोजी मालेगावात उद्धव ठाकरेंची सभा पार पडणार असून आता संजय राऊतांनी दंड थोपाटले आहेत. “येत्या २६ तारखेला शिवसेना काय आहे ते कळेल “, असं म्हणत संजय राऊतांनी थेट चॅलेंज दिलंय.

एकनाथ शिंदे यांचं बंड आणि त्यानंतरच्या घडामोडीनंतर शिवसेनेचं नाव आणि त्यांचं धनुष्यबाण हे चिन्ह सुद्धा एकनाथ शिंदेंना मिळालं. त्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार कोसळून सत्तांतर झालं. यामुळे ठाकरे गट पुरता ढासाळून गेला. परंतू त्यानंतरही ठाकरे गटाने पुन्हा पक्षबांधणीसाठी राज्यभर शिवगर्जना सभेचं आयोजन केलंय. उद्धव ठाकरेंची खेडमधील सभा त्यांच्या भाषणाने चांगलीच गाजली. आता दुसरी सभा ही मालेगावात होणार असून या सभेसाठी संजय राऊत मैदानात उतरले आहेत. येत्या २६ मार्च रोजी मालेगावात होणाऱ्या या सभेसाठी जंगी तयारी करण्यात येतेय.

आज संजय राऊत मालेगावात आले आहेत. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंच्या सभेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेला इशारा दिलाय. यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, “गेल्या ५५ वर्षापासून शिवसेना आहे. बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेली ही शिवसेना आहे. बाळासाहेब ठाकरेंना मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान व्हायचं नव्हतं. मराष्ट्राच्या राजधानीत मुंबई मराठी माणसाला सन्मानाने जगता यावं या जिद्दपोटी बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना निर्माण केली. बाळासाहेब ठाकरेंनी कधी मला शिवसेनाप्रमुख करा असं सांगितलं नव्हतं. जनतेने त्यांना शिवसेनाप्रमुख केलं. हे पद त्यांना जनतेने दिलेलं आहे. निवडणूक आयोग काय आमच्याकडून पद काढून घेणार? त्यांची लायकी आहे का? अशा कठोर शब्दात टीका संजय राऊतांनी केली. तसंच निवडणूक आयोगाला विचारून बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना उभा केली नाही. निवडणूक आयोगाचा बाप आला तरी आमच्याकडून शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह आमच्याकडून काढून घेऊ शकणार नाहीत, असं देखील संजय राऊत म्हणाले.

यापुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, “लोक म्हणतात संजय राऊत टोकांच बोलतात. तर मी टोकाचंच बोलणारा माणूस आहे. कारण मी कुणाच्या बापाला घाबरत नाही. मी माझ्या पक्षासाठी तुरूंगात गेलो. पण मी या गद्दारांप्रमाणे गुडघे टेकले नाही. तुरूंगात मी अतोनात त्रास सहन केला. पण मी शिवसेना सोडली नाही. प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे हा शिवसेनेचा खूप मोठा इतिहास आहे. हा इतिहास सहज कुणाला चोरता येणार नाही. येत्या काळात संघर्ष भरपूर आहे, पण विजय आपलाच आहे. दिल्ली आणि महाराष्ट्रात आपलंच राज्य असणार आहे. तेव्हा पाहू ईडी आणि सीबीआय काय करते”, असं म्हणत संजय राऊतांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केलाय.