घरमहाराष्ट्र"नागालॅंडमध्ये राष्ट्रवादी कमी पडतेय", या संजय राऊतांच्या वक्तव्यामागे दडलंय काय?

“नागालॅंडमध्ये राष्ट्रवादी कमी पडतेय”, या संजय राऊतांच्या वक्तव्यामागे दडलंय काय?

Subscribe

नागालॅंडमध्ये राष्ट्रवादी भाजपसोबत सरकार स्थापन करण्याच्या निर्णयानंतर ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या नात्यात मिठाचा खडा पडला की काय, अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे.

महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जाणारे भाजप आणि राष्ट्रवादी हे नागालॅंडमध्ये एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार आहे. नागालॅंडच्या मुख्यमंत्र्यांना राष्ट्रवादीकडून पाठिंबाच स्वतः राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केला. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ माजली. यावर आता संजय राऊतांनी एक खळबळजनक वक्तव्य केलंय. “नागालॅंडमध्ये राष्ट्रवादी कमी पडतेय. तसंच नागालॅंडमध्ये भाजपचं सरकार नाही, तिथल्या प्रादेशिक पक्षाच्या सरकारमध्ये भाजप सामील झालाय”, असं संजय राऊत म्हणाले. यानंतर संजय राऊतांनी राष्ट्रवादीबाबत केलेल्या वक्तव्याने चर्चांना उधाण आलंय.

नागालॅंडमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपसोबत सत्तेत बसण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली आहे. यावर संजय राऊतांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय. यावर माध्यमांशी बातचीत करत असताना संजय राऊतांनी मोठं वक्तव्य केलंय. नागालॅंडमध्ये राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याच्या निर्णयाबाबत संजय राऊतांना सवाल केला असताना ते म्हणाले की, नागालॅंडमध्ये भाजपने सत्ता स्थापन केलेली नाही. तिथे असलेल्या प्रादेशिक पक्ष एनडीपीपीला २५ जागा मिळाल्या आहेत. भाजपने १२ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे नागालॅंडमध्ये भाजपचं सरकार नाही, इतर लहान पक्षाप्रमाणेच भाजपही तिथल्या मुख्य पक्षाच्या सरकारमध्ये सामील झालंय. नागालॅंड हा संवेदनशील राज्य आहे. जम्मू कश्मीरपेक्षाही जास्त संवेजनशील राज्य नागालॅंड आहे. तिथे सतत दहशतवाद सुरू असतो. सगळ्या लहान पक्षांनी एकत्र येऊन नागालॅंडमध्ये सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. नागालॅंडमध्ये अशा प्रकारचा प्रयोग पहिल्यांदाच झाला असं नाही. यापूर्वीही तिथे एकत्रित सरकार करण्याचा निर्णय झालेला आहे. ज्या पद्धतीने नागालॅंडमध्ये सीमावर्ती भागात दहशतवादी कारवाया घडत असतात, अशा ठिकाणी राजकीय संघर्ष बाजूला ठेवून विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊले उचलणे गरजेचे असतात. हे तिथल्या लोकांपर्यंत पोहोचवण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस कमी पडतेय.” तसंच यावर आज महाविकास आघाडीची बैठक बोलावली असून याविषयावर चर्चा करण्यात येईल, असं देखील संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माफ केलं या विधानावर सुद्धा संजय राऊतांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, “आम्ही त्यांच्याकडे माफ करा अशी मागणी केलेली नाही. त्यांना माफ करायचं की नाही, हे आम्ही ठरवणार. ज्या पद्धतीने महाराष्ट्रातील प्रखर हिंदुत्ववादी पक्ष स्वतःच्या स्वार्थासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून तोडला, हा महाराष्ट्रावर केलेला आघात आहे. त्यामुळे जनता ठरवेल की त्यांना माफ करायचं की नाही.” तसंच महाराष्ट्राच्या काळजात घुसलेला हा बाण आहे. हा घाव महाराष्ट्र आणि शिवसेना कधीच विसरणार नाही. असं देखील संजय राऊत म्हणाले.

यापुढे संजय राऊतांनी भाजपसोबतच्या मैत्रीबाबतही वक्तव्य केलंय. भविष्यात भाजपसोबत कधीच मैत्री होणार नाही. “राजकारणात मतभेद होत असतात, यापूर्वीही झालेले आहेत. पण तुम्ही बाळासाहेब ठाकरेंनी तयार केलेला पक्ष फोडता आणि चोर लफंग्याच्या हातावर ठेवता, जनता तुम्हाला माफ करणार नाही.”, असं देखील संजय राऊत म्हणाले.
यानंतर संजय राऊतांना जेव्हा अजित पवारांच्या वक्तव्याबाबत प्रश्न केला असता संजय राऊतांनी यावर उत्तर देण्यास नकार दिला. ‘अजित पवार काय म्हणतात याचं मला काही करायचं नाही. मी माझ्या पक्षाबद्दल बोलतोय.” असं बोलत संजय राऊतांनी विषय टाळला. त्यामुळे आधी नागालॅंडमध्ये राष्ट्रवादी कमी पडतेय हे वक्तव्य आणि नंतर अजित पवारांच्या वक्तव्यावर बोलणं टाळणं हे दोन्ही पाहता नागालॅंडमध्ये राष्ट्रवादी भाजपसोबत सरकार स्थापन करण्याच्या निर्णयानंतर ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या नात्यात मिठाचा खडा पडला की काय, अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -