घरमहाराष्ट्र"राज्यपाल महाराष्ट्राला मिळाले, भाजपला नाही", संजय राऊतांचा खोचक टोला

“राज्यपाल महाराष्ट्राला मिळाले, भाजपला नाही”, संजय राऊतांचा खोचक टोला

Subscribe

महाराष्ट्राला नवे राज्यपाल मिळाल्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही नव्या राज्यपालांचं स्वागत करत भाजपला टोला दिला.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केल्यानंतर रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे. बैस हे महाराष्ट्राचे २० वे राज्यापाल आहेत. रमेश बैस हे आधी झारखंडचे राज्यपाल होते. महाराष्ट्राला नवे राज्यपाल मिळाल्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही नव्या राज्यपालांचं स्वागत करत भाजपला टोला दिला.

संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर टीकासत्र सुरू झालंय. “महाराष्ट्राला नवे राज्यपाल मिळाले. आनंद आहे.राज्यपालांनी घटनेनुसार काम करावे.राजभवनाचे भाजप कार्यालय करु नये, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले. त्यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांकडून संजय राऊत यांच्या वक्तव्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसून येत आहेत. त्यावर संजय राऊत यांनी पुन्हा एकदा ट्विट करत यावर आणखी एक वक्तव्य केलंय.

- Advertisement -

भगतसिंह कोश्यारींनी भाजपचे राजभवनातील एजंट म्हणून काम केल्याचं संजय राऊत म्हणाले होते. तसेच, नव्या राज्यपालांचं नाव बैस आहे की बायस हे माहित नसल्याचा टोलाही राऊतांनी लगावला होता.”राज्यपालांना तात्काळ हटवणं गरजेचं होतं पण केंद्र सरकारने ते केलं नाही. शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना पाठीशी घातल्याची इतिहासात नोंद राहील. नव्या राज्यपालांनी राजभवनाला भाजप कार्यालय बनवू नये, असंही राऊत म्हणाले होते. हे सरकार घटनाबाह्य असल्याचं भानही राज्यपालांनी ठेवावं, असा सल्लाही राऊतांनी दिला होता.

- Advertisement -

“महाराष्ट्रला नवे राज्यपाल मिळाले. आनंद आहे.राज्यपालांनी घटनेनुसार काम करावे.राजभवनाचे भाजपा कार्यालय करु नये असे मत व्यक्त होताच भाजपास मिरच्या का झोंबाव्यात? राज्याने कटू अनुभव घेतला आहे.राज्यपाल महाराष्ट्रला मिळाले फक्त भाजपाला नाही, याचे भान ठेवले तरी पुरे” असं ट्विट करत त्यांनी भाजपच्या ट्विटर हॅंडलला देखील टॅग केलंय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -