Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश "न्यायव्यवस्था खिशात टाकण्याचा प्रयत्न", संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

“न्यायव्यवस्था खिशात टाकण्याचा प्रयत्न”, संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

Subscribe

यावेळी बोलताना संजय राऊतांनी भाजपवर सरकारवर तिखट शब्दात हल्लाबोल केलाय. तसंच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये जाहीर सभा होणार आहे. यावर संजय राऊतांनी भाष्य केलंय.

राहुल गांधींच्या विदेशातील विधानावरुन गदारोळ झाला आहे. राहुल गांधी यांनी ब्रिटीश संसदेत भाषण केले. यानंतर राहुल गांधींनी देशातील लोकशाहीचा अपमान केल्याचा आरोप भाजपने केला आहे. काँग्रेस आणि राहुल गांधी हे आरोप फेटाळत असले तरी. आता भाजपने राहुल गांधी यांचं लोकसभा सदस्य पद रद्द करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. ‘राहुल गांधींनी लोकशाही वाचवण्यासाठी आवाज उठवलाय. त्यामुळे त्यांनी माफी का मागावी?’ असा सवाल यावेळी संजय राऊतांनी उपस्थित केला.

ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना संजय राऊतांनी भाजपवर सरकारवर तिखट शब्दात हल्लाबोल केलाय. “सरकारविरोधात बोलणं हा देशद्रोह नाही. कायद्यामंत्र्यांनी असं वक्तव्य करणं हा न्यायव्यवस्थेवर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे. किरण रिजीजूंकडून न्यायालयावर दबाव टाकण्याचा प्रयत्न होतोय. आमचं ऐका नाहीतर कारवाईला सामोरे जा, अश्या धमक्या न्यायमूर्तींना दिल्या जात आहेत. हा देशाच्या संविधानाचा आणि कायद्याचा मोठा अपमान आहे. राहुल गांधीनी याच हुकूमशाहीविरोधात लंडनमध्ये आवाज उठवला. म्हणूनच लोकसभेचं सदस्यपद रद्द करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे.” असं म्हणत संजय राऊतांनी भाजपला टार्गेट केलंय.

- Advertisement -

तसंच भाजप जेव्हापासून सत्तेत आले आहे, तेव्हापासून संविधान आणि कायदा मानत नाही. आधी निवडणूक आयोग आणि नंतर सीबीआय, ईडीसारख्या संस्थेमध्ये भाजप सरकार हस्तक्षेप करत आहे. देशाची न्यायव्यवस्था आपल्या खिशात टाकण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. पण या देशात असेही काही न्यायमूर्ती आहेत, जे सरकारच्या दबावापुढे झुकण्यासाठी तयार नाहीत. अशा न्यायमूर्तींना धमकवालं जात असल्याचं देखील संजय राऊतांनी सांगितलं.

यापुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, “हे सरकार आमजा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. आमच्यावर खोट्या केसेस दाखल करून आम्हाला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहेत. अशा परिस्थितीत लोकशाही वाचवण्यासाठी राहुल गांधी तर प्रयत्न करत आहेत तर त्यांनी माफी का मागावी?” असं सवाल उपस्थित करत राहुल गांधी माफी मागणार नाहीत असं देखील संजय राऊतांनी सांगितलं. जर माफी मागायची असेल तर ती भाजपने मागावी, असं देखील संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

संत तुकाराम यांच्याविषयी वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आलेले धीरेंद्र शास्री महाराज उर्फ बागेश्वर बाबा हे आज मीरा रोड येथे कार्यक्रम घेणार आहेत. बागेश्वर बाबाच्या या कार्यक्रमाला विरोध होताना दिसून येतोय. यावरही बोलताना संजय राऊत यांनी संत तुकाराम यांच्याविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या बाबांना महाराष्ट्रात आमंत्रित करणाऱ्यांना महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे, हे कळलं पाहिजे. हा सगळा आरएसएसचा खेळ आहे. राजकारणात पुन्हा एकदा जात-पात आणि धर्माचं वादळ आणण्याचा हा प्रयत्न असल्याचं सांगून संजय राऊतांनी टीका केलीय.

तसंच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये जाहीर सभा होणार आहे. यावर संजय राऊतांनी भाष्य केलंय. “५ मार्च रोजी उद्धव ठाकरेंच्या सभेला चित्र स्पष्ट झालंय. आता तिथे कोण येतंय आणि कोणत्या सभा घेत आहेत, यावर बोलण्यात रस नाही. पण जनता कुणाबरोबर आहे हे येत्या निवडणूकांमध्ये स्पष्ट होईल”, असं म्हणत संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधलाय.

- Advertisment -