राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुन्हा तपासावेत – खासदार संजय राऊत

sanjay raut slams modi government Seeing the atmosphere in the country British rule was good
देशातील वातावरण पाहून इंग्रजांची राजवट बरी होती, संजय रांऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीच्या भोंग्यासमोर हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन मनसैनिकांना केले होते. त्यानंतर आज अनेक मशिदींमध्ये सकाळची अजान ही भोंग्याविना झाली. या आंदोलनावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुन्हा तपासावेत आजही आमचा श्वास हा बाळासाहेबांच्या विचारानं चालतो, असं संजय राऊत म्हणाले.

राज ठाकरेंनी पुन्हा एकदा बाळासाहेब तपासायला हवेत

संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, राज ठाकरेंनी पुन्हा एकदा बाळासाहेब तपासायला हवेत. आजही आमचा श्वास हा बाळासाहेबांच्या विचारानं चालतो. बाळासाहेब ठाकरे यांनी भोंग्यांबाबत, नमाजाबद्दल भूमिका घेतली. नमाजाबद्दल तोडगा दिला आणि सत्ता आल्यावर ते बंद केला. मशिदीवरील बेकायदेशीर भोंगे बंद करा, असं बाळासाहेब ठाकरे सांगत होते. सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिला आणि संपूर्ण देशासाठी एक निर्णय झाला, असं राऊत म्हणाले.

प्रत्येकानं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं पालन केल पाहिजे

मुंबईसह महाराष्ट्रामध्ये आंदोलनाचा प्रश्न कुठं येतो. राज्याचे पोलीस महासंचालक, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मुंबई पोलीस आयुक्त यांनी केलेलं निवेदन ऐकलं आहे. राज्यात आंदोलनाची हाक का दिली माहिती नाही. गृहमंत्र्यांशी संबंधित प्रश्नावर मी उत्तर देण्याची गरज नाही. मात्र, राज्याचा नागरिक म्हणून राज्यात भोंग्याच्या प्रश्नावरुन आंदोलन करावं इतकी बिघडलेली नाही, असं राऊत म्हणाले.

प्रत्येकानं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं पालन केल पाहिजे. कायदा आणि न्यायालय हे धर्माच्या वर आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं उल्लंघन करणं म्हणजे समान नागरी कायद्याचं उल्लंघन करत आहेत, असा आरोप राऊतांनी केला आहे.

आंदोलनं फक्त चिथावणीसाठी नसतात

मला तर कोणत्याही प्रकारचं आंदोलन झालेलं दिसत नाही. जर या मुंबईसह राज्यामध्ये बेकायदेशीर भोंगेच नसतील आणि तुम्हीच तुमचे भोंगे लावणार असाल तर तुम्ही आंदोलन करताय की बेकायदेशीर कृत्य करताय हे तुम्हीच ठरवा. आंदोलनाचा सर्वात जास्त अनुभव हा शिवसेनेला आहे. माझ्या बाजूला शिशीर शिंदे बसले आहेत. हे आंदोलनाचे जनक आहेत. आंदोलनं कशी आणि कशाप्रकारे करावी, हे शिवसेनेकडून शिकलं पाहीजे. आंदोलनं फक्त चिथावणीसाठी नसतात. गेली ५० ते ५५ वर्षे शिवसेना आंदोलनच करत आहे. तसेच सत्तेमध्ये जरी आम्ही असलो तरी आमचा संबंध कायम आहे.


हेही वाचा : स्वत:चा भाऊ मुख्यमंत्री झाला म्हणून इतका द्वेष करणं दुर्दैवी, किशोरी पेडणेकरांची राज ठाकरेंवर टीका