घरताज्या घडामोडीआता आपले मार्ग वेगळे, संजय राऊतांनी बंडखोर शिंदे गटाला स्पष्टच सांगितलं

आता आपले मार्ग वेगळे, संजय राऊतांनी बंडखोर शिंदे गटाला स्पष्टच सांगितलं

Subscribe

आता तुमचे आणि आमचे मार्ग वेगळे आहेत, तुम्ही तुमच्या मार्गाने जाऊ शकता असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना अप्रत्यक्षपणे परत न येण्याचा इशारा केला आहे.

आता तुमचे आणि आमचे मार्ग वेगळे आहेत, तुम्ही तुमच्या मार्गाने जाऊ शकता असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बंडखोर आमदारांना अप्रत्यक्षपणे परत न येण्याचा इशारा केला आहे. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधून शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. तसेच, शिवसेना आता विरोधी बाकावर बसायलाही तयार असल्याचं त्यांनी सांगितलं. (Sanjay Raut on rebel mla for their different way)

हेही वाचा – राज्यपालांनी बोलावलेलं विधानसभेचे विशेष अधिवेशन स्थगित

- Advertisement -

संजय राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीची स्थापना होत असताना अनेक आमदारांना चांगली खाती मिळाली. वेगळा प्रयोग होतोय म्हणून सगळ्यांनी कौतुक केलं. शेवटी त्यांनी संजय राऊत आणि शरद पवार यांच्यावर दोषारोप करत पाठीत खंजीर खुपसला. यामध्ये हाडाचे कडवट शिवसैनिकही होते याचं दुःखं वाटतंय.

सरकार पाडण्याचं कॉन्ट्रॅक्ट

- Advertisement -

शिंदे गटाला सरकार पाडून दाखवायचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं, ते कॉन्ट्रॅक्ट त्यांनी यशस्वी करून दाखवलं असंही राऊत म्हणाले. महाराष्ट्रावर प्रेम करणारी लोक राज्य चालवत होते, पक्षाबरोबर राहून आम्ही समन्वयाने काम करत होतो. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर सगळ्यांचा विश्वास होता. सर्व जाती-धर्मातील लोकांनी उद्धव ठाकरेंवर विश्वास ठेवला होता, असंही राऊतांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा – एक संवेदनशील सुसंस्कृत मुख्यमंत्री गमावला : संजय राऊत

…तर विरोधक म्हणून काम करू

महाराष्ट्रात आता नवीन सरकार येणार असेल तर आम्ही उत्तम विरोधक म्हणून बसायला तयार आहोत. आम्ही आता विरोधक म्हणून काम करू. पहिल्या दिवसापासूनच सरकार पाडू अशा धमक्या देणार नाहीत. पण पक्ष संघनटेच्या कामालाही झोकून काम करू असंही संजय राऊतांनी पुढची रणनीतीबाबत सांगताना सांगितले.

हेही वाचा – ‘माझ्याच लोकांनी दगा दिला’; मुख्यमंत्र्यांच हे विधान मन हेलावून टाकणारं-संजय राऊत

होय, मी जबाबदार

महाविकास आघाडीची स्थापना केली म्हणून मी जबाबदार असेन तर ठिक आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून जे स्वप्न पाहिलं होतं त्या वचनासाठी मी प्रतिष्ठा पणाला लावली असेल तर मी जबाबदारी घेतो. पण आता तुम्ही शिवसेनेचा मुख्यमंत्री करताय का? तुमचा नेता तरी मुख्यमंत्री होणार आहे, तुम्ही आता परत चाकरीच करणार आहात, असं म्हणत संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर टोला लगावला.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -