घरमहाराष्ट्रमुंबईत सध्या 'मुका घ्या मुका' सिनेमा सुरू आहे..., संजय राऊतांची टीका

मुंबईत सध्या ‘मुका घ्या मुका’ सिनेमा सुरू आहे…, संजय राऊतांची टीका

Subscribe

दादा कोंडके असते तर त्यांनी त्यांच्यावर सिनेमाच काढला असता, असं देखील संजय राऊत म्हणाले.

माजी नगरसेविका शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकास सुर्वे व्हायरल व्हिडीओ प्रकरणात पोलिसांकडून धरपकड सुरू असून यावर आता संजय राऊतांनी आपली तिखट प्रतिक्रिया दिली आहे. देशातील विरोधी पक्षातील नेत्यांवर होत असलेल्या अन्यायाचा पाढा वाचत संजय राऊतांनी शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओवर भाष्य केलंय.

आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊतांनी ठाकरे गटाला टार्गेट करण्याचं राजकारण सुरू असल्याचं सांगितलं. यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, “जगातील १०० शक्तिशाली युवकांमध्ये बाळासाहेब ठाकरेंचे नातू आदित्य ठाकरेंचा यांचा समावेश होणं हा महाराष्ट्रासह देशाचाही गौरव आहे. एकीकडे देशाला ऑस्कर मिळाला आणि दुसरीकडे आदित्य ठाकरेंची १०० शक्तिशाली युवकांमध्ये समावेश झाला. यासाठी आम्ही सगळे आनंदी आहोत.”

- Advertisement -

तसंच गेल्या काही महिन्यापासून ठाकरे कुटूंब आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना टार्गेट करण्याचं राजकारण सुरूय. या एकमेव हेतूने देशाचं राजकारण सुरूय. मग तो संपत्तीचा विषय असो किंवा मग व्हिडीओ मॉर्फिंगचा असो. पण या देशातील न्यायव्यवस्था अजुनही जिवंत आहे. त्यामुळे आम्हाला न्यायव्यवस्थेकडून आशेचे किरण दिसतात. महाराष्ट्रात खोकेवाल्यांचं सरकार आहे. या खोकेवाल्यांकडून हिशोब मागायला हवं. पण ते आमचा हिशोब मागत आहेत. तुम्ही असे कायदेशीर आणि बेकायदेशीर हल्ले कितीही करा, तुमचे हे हल्ले आम्ही परतवून लावू.”, असा इशारा देखील यावेळी संजय राऊतांनी दिला.

शीतल म्हात्रे व्हिडीओ प्रकरणावर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले की, “मुंबईत सध्या मुका घ्या मुका सिनेमा सुरू आहे. या व्हिडीओ प्रकरणात ठाकरे गटााच्या कार्यकर्त्यांना का अटक करत आहेत? त्यांचा या प्रकरणाशी संबंध काय आहे? हा सत्तेचा गैरवापर आहे. आम्ही सांगितलं होतं जाहीर कार्यक्रमात मुका घ्यायला. मुळात हा व्हिडीओ खरा की खोटा हे आधी समोर येऊ द्या. हा व्हिडीओ आमदाराच्या मुलाने शेअर केला आहे. त्याला अटक का केली नाही? ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या घरी पोलीस येऊन चौकशी करत आहेत. तुमच्या पक्षातील जर अंतर्गत मतभेद असतील तर तुम्ही मिटवा. शिवसेनेला टार्गेट करू नका.”

- Advertisement -

राणेंवर साधला निशाणा
देशात फक्त विरोधी पक्षाच्या नेत्यांना टार्गेट केलं जात आहे. सत्ताधारी पक्षाचे लोक जणू काही दुधाने अंघोळ करतात. नारायण राणे यांच्या भ्र्ष्टाचार संदर्भात भाजपची काय भूमिका होती? नारायण राणे हे तुरूंगात असायला हवे होते अशी भाजपची भूमिका होती. सगळे पुरावे असताना केवळ ते भाजपच्या वॉशिंगमशीनमध्ये गेले म्हणून त्यांना अभय मिळालं. विरोधी पक्षांवर अत्यंत चूकीच्या पद्धतीने कारवाया सुरू आहेत. प्रत्येकावर राजकीय सूडबुद्धीनेच कारवाई केली जात असल्याचा आरोपही यावेळी संजय राऊतांनी केला.

तसंच मी काल भीमा पाटस साखर कारखान्याचं एक प्रकरण पुराव्यासह दिलं. क्राऊड फंडींग संदर्भात जर साकेत गोखले जेलमध्ये असेल तर त्याच क्राऊड फंडींग प्रकरणात INS विक्रांत वाचवा या नावाने जे पैसे गोळा करणाऱ्या किरीट सोमय्यांना क्लीनचिट कशी मिळते? असा सवाल देखील यावेळी संजय राऊतांनी उपस्थित केला.

तसंच या प्रकरणात पहिले गुन्हेगार आमदार प्रकाश सुर्वे आहेत. दादा कोंडके असते तर त्यांनी त्यांच्यावर सिनेमाच काढला असता. तुम्ही मुके घ्या किंवा मिठ्या मारा. हा तुमचा प्रश्न आहे. सार्वजानिक ठिकाणी अश्लिल वर्तन करत असाल आणि त्यावर कुणाचा आक्षेप असेल तर पहिला गुन्हा आक्षेपार्ह वर्तन करणाऱ्यावर केला पाहिजे. पण तसं न करता आमच्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या घराचे दरवाजे रात्री अपरात्री पोलीस येऊन वाजवतात, त्यांच्या कुटूंबियांची चौकशी करतात. ही मोघलाई सुरूये का? तुम्ही मुके घेतलेत, तुम्ही निस्तारा. आमच्यावरती बोट दाखवू नका. शाहिस्तेखानाची बोट तुटली हे लक्षात घ्या.”, असं देखील संजय राऊत म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -