मुंबई : माझं आणि राजन साळवी यांचं कालच बोलणं झाल्याचं सांगितलं. तसेच, सुनील राऊतांशीही त्यांचं बोलणं झालं आणि त्यांच्या बोलण्यातून तसं दिसत नाही, असं संजय राऊत यांनी सांगितलं. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी हे 3 फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं. (Sanjay Raut On Shiv Sena Talk On MLA Rajan Salvi)
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना राजन साळवी यांच्या शिवसेनेतील प्रवेशाच्या चर्चांवर भाष्य केलं. त्यानुसार, “माझं आणि राजन साळवी यांचं कालच बोलणं झाल्याचं सांगितलं. तसेच, सुनील राऊतांशीही त्यांचं बोलणं झालं आणि त्यांच्या बोलण्यातून तसं दिसत नाही. मी बाळासाहेब ठाकरे यांचा पक्का शिवसैनिक आहे, असं त्यांनी सांगितल”, असे संजय राऊत म्हणाले.
याशिवाय, “माझ्या डोक्यातही असं कोणताही विचार नाही. असं ते सांगतात आणि आम्हाला आमच्या सहकाऱ्यांवर विश्वास आहे. भविष्यात असं काही असं घडलं तर पाहू. पण संकट काळात जे पळून जातात त्याची इतिहासात नोंद राहत”, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.
‘जाणाऱ्या प्रत्येकाचं कारण वेगळं’
ज्या बैठका होतात त्यात उद्धव ठाकरे बोलतात, ज्यांना जायचय त्यांनी जा, त्यावर “उद्धव ठाकरे असं कधी म्हणणार नाहीत. मी स्वत: अनेक बैठकांना उपस्थित असतो. आपण घडवलेले कार्यकर्ते अशा पद्धतीने जातात हे पाहून वाईट वाटतं. राजूल पटेल गेल्या याचं दु:ख झालं. जाणाऱ्यांनी विचार केला पाहिजे”, असं संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा – Sanjay Raut On Shiv Sena : राज ठाकरेंचा दाखला देत संजय राऊतांची शिवसेनेवर टीका; नेमकं काय म्हणाले?