Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र ठाकरे-फडणवीस यांच्यात नवी युती? राऊत म्हणतात, विधिमंडळात जाण्याचा रस्ता एकच...,

ठाकरे-फडणवीस यांच्यात नवी युती? राऊत म्हणतात, विधिमंडळात जाण्याचा रस्ता एकच…,

Subscribe

Sanjay Raut News | आम्ही ठरवलं त्याप्रमाणे आम्ही आमचा पक्ष पुढे नेत आहोत. दुसऱ्यांची डोकी आमच्या पक्षासाठी लागत नाहीत, असंही संजय राऊतांनी पुढे स्पष्ट केलं.

Sanjay Raut News | मुंबई – राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल, गुरुवारी एकत्र विधानभवन परिसरात एन्ट्री घेतली. एवढंच नव्हे तर दोघांच्याही चेहऱ्यावर स्मितहास्य होतं. दोघेही गप्पा मारत विधानभवन परिसरात आले. यामुळे पुन्हा एकदा नव्या युतीची चर्चा काल दिवसभर राज्यात रंगली. परंतु, यात युतीचे संकेत नसल्याचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. आज ते मालेगाव दौऱ्यावर आहेत. यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा – Video : ही दोस्ती तुटायची नाय! राजकीय शत्रुत्वानंतरही ठाकरे आणि फडणवीस एकत्र

- Advertisement -

दोघांसाठी वेगळा रस्ता निर्माण करता आला तर पाहू. विधिमंडळात जाण्याचा रस्ता एकच आहे. या चर्चा आणि अफवा यामध्ये काही अर्थ नाही, असं स्पष्टीकरण संजय राऊतांनी आज दिलं.

शिवसेनेला स्क्रिप्टेड करण्याची गरज नाही. आम्हाला बाहेरून सलिम जावेद लागत नाहीत. आम्ही स्वतंत्र बुद्धीने काम करतो. आमचा पक्ष आहे तो आहे. आम्ही ठरवलं त्याप्रमाणे आम्ही आमचा पक्ष पुढे नेत आहोत. दुसऱ्यांची डोकी आमच्या पक्षासाठी लागत नाहीत, असंही संजय राऊतांनी पुढे स्पष्ट केलं.

- Advertisement -

कालच्या बैठकीला सर्वच पक्ष उपस्थित होते, निवडणूक आयोगाची लफंगेगिरीविरोधात शरद पवारांच्या उपस्थितीत बैठक झाली. ईव्हीएमविरोधात सर्वांत आधी आवाज भाजपाने उठवला आहे. सुब्रमण्यम स्वामी आणि किरीट सोमय्या या दोन महावीरांनीच ईव्हीएमविरोधात आवाज उठवला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर इव्हीएम घोटाळ्यासंबंधित प्रात्यक्षित करून दाखवले होते. सुब्रमण्यम स्वामी यांनी इव्हीएम कशाप्रकारे घोटाळा आहे यावर पुस्तक लिहिलं आहे. हे पुस्तक इव्हीएमला समर्थन देणाऱ्यांनी वाचावे.

महाराष्ट्रातील वातावरण बिघडवायचं, दंगली घडवायच्या आणि मग निवडणुकीला सामोरे जायचं अशी स्क्रिप्ट लिहिली जात आहे. जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करून दंगली घडवायच्या आणि पुन्हा एकदा राज्यात आणि देशात भीतीचं वातावरण निर्माण करून पटकथा लिहिली जात आहे. परंतु, ही पटकथा लोकांपर्यंत पोहोचली आहे त्यामुळे या पटकथेला जनमाणसांत स्थान नाही, असं म्हणत राज ठाकरेंवरही संजय राऊतांनी टीकास्त्र डागलं.

- Advertisment -