Sanjay Raut On Pm Narendra Modi मुंबई : प्रयागराज येथील कुंभ मेळ्यात आज 10 श्रद्धाळूंचे प्राण गेले. त्यानंतर तातडीच्या बैठका सुरू झाल्या. पंतप्रधान आणि गृहमंत्री लक्ष ठेवून आहेत म्हणजे नेमकं काय करत आहेत. यांच्या लक्ष ठेवल्याने ज्यांनी प्राण गमावले ते परत येणार आहेत का? असा सवाल उपस्थित करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला. (Sanjay Raut On Yogi Adityanath Prayagraj kumbh Mela Narendra Modi And Amit Shah Sanjay Raut News In Marathi)
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज (28 जानेवारी) माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी प्रयागराज येथील कुंभ मेळ्यात घडलेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेवर भाष्य केलं. “प्रयागराज येथे महाकुभ मेळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळ्याला आलेल्या कोट्यावधी लोकांची आम्ही कशाप्रकारे व्यवस्था केली आहे, हे सागणं म्हणजे मार्केटींग करण्यासारखे आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि उत्तर प्रदेश सरकारकडून हे सुरू होतं आणि त्यामध्ये चुकीचं काहीच नाही. पण कुंभ हा मार्केटींगचा विषय नाही. ज्या भक्तांची श्रद्धा आहे ते भक्त कुंभ मेळ्याला जात असतात. कोट्यावधी लोकांचे आकडे रोज दिले जात आहेत. पण सामन्य माणसाला 10 ते 15 किलोमीटर लांबून चालत जावं लागत आहे. जनतेच्या प्रतिक्रिया पाहिल्या तर तेथील व्यवस्थेवर जनता खूश नाही. शेवटी आज दुर्देवाने चेंगराचेंगरी झाली, शेकडो लोकं जखमी आहेत. तसेच, 10 पेक्षा जास्त श्रद्धाळूंना आपले प्राण गमवावे लागले”, असे संजय राऊत म्हणाले. ()
“स्वत: गृहमंत्री तिथे येऊन गेले तेव्हा आम्ही तिकडचा सर्व लवाजमा पाहिला. गृहमंत्री आले तेव्हा घाट बंद करण्यात आला होता. म्हणजे लोकांची गैरसोय झाली. संरक्षण मंत्री आले तेव्हाही प्रयागराज आणि घाट सील करण्यात आला. जेव्हा-जेव्हा वीआयपी जात आहेत. तेव्हा-तेव्हा घाट आणि संबंधीत परिसर बंद केला जातो, त्याचाही हा परिणाम असावा. कारण लोकं बाहेर प्रतिक्षेत थांबलेले असतात. या सगळ्याचा परिणाम पाहिला तर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री किंवा कुंभमेळ्याची जबाबादारी सांभाळणारे मंत्री असतील त्यांनी मार्केटींगवर लक्ष देण्यापेक्षा श्रद्धाळू आहेत, त्यांची व्यवस्था आणि सुरक्षेकडे लक्षं देण्याची गरज आहे”, असं म्हणत संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला.
“आज 10 श्रद्धाळूंचे प्राण गेले. त्यानंतर तातडीच्या बैठका सुरू झाल्या. पंतप्रधान आणि गृहमंत्री लक्ष ठेवून आहेत म्हणजे नेमकं काय करत आहेत. यांच्या लक्ष ठेवल्याने ज्यांनी प्राण गमावले ते परत येणार आहेत का? अनेक लोकं विशेषता महिला खुल्या रस्त्यावर झोपत आहेत. मग यांची कसली व्यवस्था”, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.
हेही वाचा – Mahakumbh Stampede : चेंगराचेंगरीनंतर अमृतस्नान होणार की नाही? आखाडा परिषदेचा मोठा निर्णय