घरमहाराष्ट्रNitesh Rane : दत्ता दळवींची गाडी फोडणारे राऊतांचे लोक, नितेश राणेंचा आरोप

Nitesh Rane : दत्ता दळवींची गाडी फोडणारे राऊतांचे लोक, नितेश राणेंचा आरोप

Subscribe

दत्ता दळवी यांच्या वाहनांची तोडफोड करणारे हे राऊतांचे लोक होते, असा आरोप नितेश राणे यांच्याकडून करण्यात आला आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना नितेश राणेंनी दत्ता दळवी यांच्यावरून राऊत बंधुंवर विविध आरोप केले आहेत.

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे रविवारी (ता. 26 नोव्हेंबर) भांडुपमध्ये ईशान्य मुंबईत राहणाऱ्या कोकणवासियांचा जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे राजस्थान प्रचारावेळी लावण्यात आलेल्या हिंदुह्रदयसम्राट या उपमेवरून माजी महापौर दत्ता दळवी यांनी शिवीगाळ केली. सार्वजनिक सभेत संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीबदद्ल अश्लील शिवीगाळ व अपमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे उपविभागप्रमुख भूषण पालांडे यांनी भांडूप पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यानुसार भांडुप पोलिसांनी माजी महापौर दत्ता दळवी यांच्या विरोधात भा.द.वी कलम 153 (अ), 153 (ब), 153 (अ), सी, 294, 504, 505 (1) (क) अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि त्यांना अटक करण्यात आली. या घटनेनंतर दत्ता दळवी राहात असलेल्या भांडुपमधील इमारतीत शिरून त्यांच्या वाहनांची तोडफोड काल (ता. 29 नोव्हेंबर) काही अज्ञातांकडून करण्यात आली. परंतु, दत्ता दळवी यांच्या वाहनांची तोडफोड करणारे हे राऊतांचे लोक होते, असा आरोप नितेश राणे यांच्याकडून करण्यात आला आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना नितेश राणेंनी दत्ता दळवी यांच्यावरून राऊत बंधुंवर विविध आरोप केले आहेत. (Sanjay Raut people who broke Dutta Dalvi’s car, Nitesh Rane’s allegation)

हेही वाचा – Thackeray vs Shinde : …हाच नालायक कारभाराचा नमुना, ठाकरे गटाचे मुख्यमंत्री शिंदेंवर टीकास्त्र

- Advertisement -

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना नितेश राणे म्हणाले की, संजय राऊत आणि त्यांचा भाऊ सुनील राऊत यांच्यामुळे दत्ता दळवी यांनी भाजपमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण दोन दिवसांपासून राऊत बंधुंचे दत्ता दळवींवर फार प्रेम उफळत चालले आहे. मात्र, ज्यावेळी हेच दळवी ज्यावेळी त्यांच्या पक्षात होते, तेव्हा त्यांना त्रास देण्याचे काम का केले? काल ज्यांनी दत्ता दळवी यांची गाडी फोडली त्या गाडी फोडणाऱ्यांनी समोर उभे राहावे, असे सांगण्यात येत आहे. कारण ते गाडी फोडणारे लोक हे राऊत बंधुंचे लोक होते, असा मला संशय आहे, असा आरोपही नितेश राणे यांच्याकडून करण्यात आला आहे.

तर, राऊत बंधूंचा दत्ता दळवी यांच्यावर पहिल्यापासून राग होता. तो राग काढण्यासाठी हे सर्व काही सुरू आहे. गाडी फोडण्याचा प्रकार आणि गाडी फुटल्यानंतर पळून जाणारा हा बाळासाहेबांचा शिवसैनिक असू शकत नाही. पण आतापर्यंत गाडी फोडून जे काही पळून जाण्याचे प्रकार आहे, ते सर्व राऊतांनी केलेले बनाव आहेत. दत्ता दळवींना जामीन मंजूर केला नाही तर हे ईशान्य मुंबई चक्काजाम करणार असे सांगत आहेत. पण यांच्या घरचे चक्काजाम करू देणार नाही. यांनी यांच्या घराबाहेर आधी चक्काजाम करावे मग ईशान्य मुंबईची भाषा करावी. जर का ईशान्य मुंबई चक्काजाम करायची असेल तर संजय राऊत यांनी त्या ठिकाणी थांबावे, राऊतांनी तिथून पळ का काढला? पण आता ते संजय दीना पाटील यांचा लोकसभेच्या माध्यमातून राजकीय बळी देत आहेत, असा थेट हल्लाबोल नितेश राणे यांच्याकडून यावेळी करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -