घरदेश-विदेशSanjay Raut : पंतप्रधान मोदींनी देशाची माफी मागावी - राऊत

Sanjay Raut : पंतप्रधान मोदींनी देशाची माफी मागावी – राऊत

Subscribe

राज्यात भ्रष्टाचाराचे आरोप असलेले लोक पक्षात घ्यायची आणि पक्ष वाढवायचा हे देशात प्रथमच घडत आहे, अशी टिप्पणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशावरून केली आहे.

संभाजीनगर : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला आहे. अशोक चव्हाण यांच्या भाजपामध्ये जाण्याने महाविकास आघाडीला कोणताही धक्का बसणार नाही. याचा फटका बसला तर, भाजपाला बसून शकतो, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी संजय राऊत यांनी यावेळी केली आहे.

केंद्र सरकारने काढलेल्या श्वेतपत्रिकेत आदर्श घोटाळाचा उल्लेख आहे? या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, “आता काय करणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी आणि देवेंद्र फडणवीस यांनी देखील खोटे आरोप केल्यामुळे माफी मागावी”, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. अशोक चव्हाणांच्या जाण्याने राज्यसभेला फटका बसू शकतो का? या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, “राज्यसभेची आमची जागा आम्ही निवडून आणू.”

- Advertisement -

हेही वाचा – Ashok Chavan : अशोक चव्हाण यांची योग्य ठिकाणी मदत घेणार – देवेंद्र फडणवीस

अशोक चव्हाण यांच्या भाजपामध्ये प्रवेश केला आहे. याचा महाविकास आघाडीला धक्का बसणार का? यावर संजय राऊत म्हणाले, “महाविकास आघाडीला कोणताही धक्का बसणार नाही. याचा फटका बसलाच फक्त भाजपाला बसून शकतो. राज्यात भ्रष्टाचाराचे आरोप असलेले लोक पक्षात घ्यायची आणि पक्ष वाढवायचा हे देशात प्रथमच घडत आहे. भाजपा देश भ्रष्टाचार मुक्त करायला निघाले होते आणि आता त्यांच्या पक्षात भ्रष्टाचाऱ्यांना घेऊन चिखल माजविला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला धक्का बसत नाही.”

- Advertisement -

हेही वाचा – Sanjay Raut : भाजपाने काँग्रेसचे शुद्धीकरण सुरू केले – संजय राऊत

भ्रष्टाचाऱ्यांना भाजपामध्ये घेऊन राजकारणात नवा आदर्श

अशोक चव्हाण यांच्या आज सकाळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “भाजपाने शहिदांच्या अपमानाविरोधात महाराष्ट्रात आंदोलन केले होते. त्या शहिदांच्या अपमानाचे आता काय झाले? आता अशोक चव्हाणांना भाजपामध्ये घेऊन त्यांना शहिदांचा अपमान धुवून काढला का? मला वाटते सगळ्या पक्षातील भ्रष्टाचाऱ्यांना आपल्या पक्षात घेऊन भाजपा देशातील राजकारणात नवा आदर्श निर्माण करत आहे.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -