संजय राऊतांकडून राहुल गांधींचे कौतुकोद्गार, म्हणाले राजकारणात माणुसकी…

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा गेली १४ दिवस महाराष्ट्रात होती. काल, रात्री राहुल गांधी यांनी महाराष्ट्राला निरोप दिला. पुढील यात्रा आता मध्य प्रदेशात होणार आहे.

मुंबई – राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी त्यांच्या व्यस्त दिनक्रमातही मला फोन करून माझ्या तब्येतीची चौकशी केली. माणुसकीचा ओलावा संपलाय असं वाटत असतानाच त्यांनी फोन केला. प्रेमाने चौकशी केली, असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. तसंच, काही वेळापूर्वी त्यांनी याबाबत ट्विटही केले होते. (Rahul Gandhi Called Sanjay Gandhi)


संजय राऊत म्हणाले की, ‘काल रात्री उशिरा राहुल गांधींचा फोन आला होता. आधीही त्यांनी चौकशी केली होती. काल त्यांनी प्रत्यक्षात फोन करून माझ्या प्रकृतीची चौकशी केली. प्रकृतीची काळजी घ्या म्हणाले. प्रमाने चौकशी केली. व्यस्त भारत जोडो यात्रेत त्यांनी आपल्या सहकार्याला फोन केला. राहुल गांधी मैत्री जपतात.’

हेही वाचा – जय शिवाजी, जय महाराष्ट्र! राहुल गांधींनी महाराष्ट्रातून घेतला निरोप, भारत जोडो यात्रा आता मध्य प्रदेशात

‘मी तुरुंगात असताना माझ्या घरी किती लोक आले हे मला माहितेय. भाजपा, मनसे हे एकेकाळी सहकारी होते. मित्र आहेत. पण किती लोकांना चिंता आहे, याची मला जाणीव आहे. खोट्या प्रकरणात अडकवून आपल्या सहकार्याला तुरुंगात टाकलं. यावेळी किती लोकांनी माझ्या कुटुंबाची चौकशी केली? राजकीय मतभेद असतानाही राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी माझी चौकशी केली,’ असंही ते पुढे म्हणाले.

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा गेली १४ दिवस महाराष्ट्रात होती. काल, रात्री राहुल गांधी यांनी महाराष्ट्राला निरोप दिला. पुढील यात्रा आता मध्य प्रदेशात होणार आहे. मात्र, सध्या राहुल गांधी दोन दिवसांसाठी गुजरातच्या निवडणूक प्रचाराला जाणार आहेत. त्यामुळे पुढील दोन दिवस भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात स्थगित करण्यात आलीय. राहुल गांधी यांची गुजरातमधील प्रचार सभा झाल्यानंतर ते २४ नोव्हेंबरपासून पुन्हा मध्य प्रदेशपासून भारत जोडो यात्रेला सुरुवात करतील.