Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रSanjay Raut : आमच्याकडे ईव्हीएमसंदर्भात 450 तक्रारी, राऊतांनी उपस्थित केली शंका

Sanjay Raut : आमच्याकडे ईव्हीएमसंदर्भात 450 तक्रारी, राऊतांनी उपस्थित केली शंका

Subscribe

शिवसेना ठाकरे गटाकडे ईव्हीएमच्यासंदर्भात आतापर्यंत 450 तक्रारी आल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यांनी प्रसार माध्यमांसमोर ईव्हीएमबाबत शंका सुद्धा उपस्थित केली आहे.

मुंबई : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत लागलेल्या धक्कादायक निकालामुळे विरोधकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. एकीकडे महायुतीमध्ये सत्ता स्थापनेच्या बैठका सुरू असतानाच दुसरीकडे विरोधक मात्र शांत झाले आहेत. परंतु, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अनेकांनी शंका उपस्थित केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनीही पुन्हा ईव्हीएमबाबत शंका उपस्थित केली आहे. त्यांनी त्यांच्याकडेर ईव्हीएमच्यासंदर्भात 450 तक्रारी आल्याची माहिती प्रसार माध्यमांना दिली आहे. तर हा निवडणुकीचा निकाल तसाच ठेवून आता बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी, असे आव्हान महायुतीला दिले आहे. (Sanjay Raut raised doubt on the EVM Due to result of Maharashtra Assembly election Result 2004)

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सोमवारी (ता. 25 नोव्हेंबर) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महायुतीच्या सत्ता स्थापनेबाबत मत व्यक्त करत म्हटले की, महायुतीच्या दोन मित्रपक्षांकडे म्हणजेच शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाकडे साधारणतः 100 आमदार आहेत. त्यामुळे दिल्लीतून जो कोणताही मुख्यमंत्री ठरविण्यात येईल, तो स्वीकारावा लागणार आहे. तसेच, महायुतीचा जो काही फॉर्म्युला असेल तो त्यांच्या युतीसाठी असेल. शब्द पाळण्याची भाजपाची परंपरा नाही. पण आता कदाचित महाराष्ट्राशी वैर घ्यायचे असल्याकारणाने ते अशी कोणताही भूमिका घेऊ शकतात, असे राऊतांनी सांगितले.ॉ

- Advertisement -

हेही वाचा… Maharashtra Election Results 2024 : ईव्हीएमचा घोळ? 95 मतदारसंघांतील आकडेवारीवर संशय, जबाबदार कोण?

यावेळी खासदार संजय राऊत यांना महाविकास आघाडीच्या पराभवासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जबाबदार असल्याची चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले. याबाबत खासदार राऊत म्हणाले की, एका व्यक्तीवर पराभवाचे खापर फोडता येत नाही. आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढलो. शरद पवार यांच्यासारखा नेता ज्यांच्यामागे संपूर्ण महाराष्ट्र असल्याचे चित्र दिसले. त्यांनाही अपयश आले. अपयशाची कारणे शोधली पाहिजेत. ती कारणे ईव्हीएममध्ये आहेत. यंत्रणेच्या गैरवापरात आहेत, घटनाबाह्य कृत्यात आहे की डीवाय चंद्रचूड यांनी न घेतलेल्या निर्णयात आहेत. ही पराभवाची मुख्य कारणे असून त्यातील मुख्य कारण शोधले पाहिजे, असे राऊतांनी म्हटले.

- Advertisement -

तसेच, नाना पटोले, शरद पवार किंवा शिवसेना ठाकरे गटाचे नेतृत्व या पराभवाला जबाबदार आहेत का? यामधून आता बाहेर पडले पाहिजे. आम्ही तिघांनी एकत्र मिळून निवडणूक लढली. एखाद दुसऱ्या जागेवर आमचे मतभेद झाले असतील. पण आम्ही एकत्रित निवडणुका लढल्याने हे मविआचे अपयश आहे. व्यक्तीगत एका पक्षाचे अपयश आहे हे मी मानायला तयार नाही. शेवटी ज्या पद्धतीने सत्ताधारी निवडणूक लढण्यासाठी उतरले, त्याला फेअर निवडणूक मानता येणार नाही. आजही अनेक ठिकाणचे कार्यकर्ते ईव्हीएमबाबत बातम्या देत आहे. ईव्हीएमचे नंबर कसे जुळत नाही. त्याची फेरफार कशी करण्यात आली किंवा मतांचा आकडा जुळत नाही, अशा अनेक शंका घेण्यासारख्या गोष्टी आहेत, असे सांगत राऊतांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केली आहे.

ईव्हीएमच्या 450 तक्रारी…

ईव्हीएम संदर्भात उदाहरण द्यायचे झाले तर नाशिकमध्ये एक उमेदवार आहे, ज्याच्या घरात 65 मत असताना त्याला केवळ चार मतं पडली. डोंबिवलीत आमच्या कार्यकर्त्यांना असे आढळून आले की तिथे ईव्हीएमचे आकडे मॅच होत नाहीत आणि त्यावर आक्षेप घेतला तर निवडणूक आयोगाचे अधिकारी तो आक्षेप मानायला तयार नाही. अशी अनेक उदाहरणं पुढे आली आहेत. त्यांचे पुरावे ही पुढे आले आहेत. ज्यांनी कुठले असे क्रांतिकारी कार्य केले ज्यांना दीड दीड लाख मते मिळाली? काल पक्षात गेलेले लोक आमदार झाले, असा काय पराक्रम यांनी केला, जे यांना यश आले. म्हणून कुठेतरी शंकेला जागा आहे. प्रथमच शरद पवारसारख्या ज्येष्ठ नेत्याने ईव्हीएम वर संशय घेतला आहे, अशी शंका व्यक्त करत राऊतांनी टीका केली आहे.


Edited By Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -