Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रSanjay Raut : कुछ तो गडबड है... सुरुवातीच्या कलांवर संजय राऊतांना शंका

Sanjay Raut : कुछ तो गडबड है… सुरुवातीच्या कलांवर संजय राऊतांना शंका

Subscribe

राज्यातील विधानसभा निवडणुकीचे पहिल्या तीन तासांचे निकाल हाती आले असून यामध्ये भाजपा हा मोठा पक्ष ठरला आहे. तर महायुती 200 पार गेली आहे. त्यामुळे आता सुरुवातीला समोर आलेल्या कलांवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शंका उपस्थित केली आहे.

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीचे पहिल्या तीन तासांचे निकाल हाती आले असून यामध्ये भाजपा हा मोठा पक्ष ठरला आहे. तर महायुती 200 पार गेली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष मिळून 60 पारही जाऊ शकलेले नाही. उलट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 58 उमेदवार आघाडीवर आहेत. पण आलेल्या या कलांवर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी शंका उपस्थित केली आहे. महायुतीने संपूर्ण यंत्रणा विकत घेतली असून या निकालांमध्ये काही तरी गडबड करण्यात आली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. तसेच, मोदी, शहा, अदानी यांनी हा निकाल ठरवून लावला असल्याचा आरोपही राऊतांनी केला आहे. (Sanjay Raut raised doubts on the result of the Maharashtra Assembly Elections 2024)

मतमोजणी सुरू झाल्याच्या पहिल्या तीन तासांचे निकाल हे धक्कादायक आहेत. कारण ज्या प्रमाणे सर्वेक्षणाचे अहवाल समोर आलेले आहेत, त्याहीपेक्षा निकाल मात्र वेगळा पाहायला मिळत आहे. परंतु, याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना प्रसार माध्यमांनी प्रश्न विचारला. त्यामुळे या निकालाबाबत खासदार राऊत म्हणाले की, माझ्या तोंडातून एकच शब्द बाहेर पडला, कुछ तो गडबड है| एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 56 जागा कोणत्या भरवशावर मिळतात?. अजित पवार यांना 40 च्या वर जागा मिळतात. देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी असे काय दिवे लावले? इथे त्यांना 120 पेक्षा जास्त जागा मिळतात? असा प्रश्न राऊतांकडून उपस्थित करण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Maharashtra Election Results 2024 : महायुतीच्या वादळात मविआ भुईसपाट, सुरुवातीचा कल काय सांगतो?

तसेच, महाराष्ट्राच वातावरण, कल ज्या पद्धतीने होता, आम्ही ग्राऊंडवर जमिनीवर होतो. निकाल आल्यानंतर लोकशाहीच कौल, प्रथा मानण्याची परंपरा आहे. आम्ही ती पाळलेली आहे. पण हा कौल कसा मानावा? असा प्रश्न राज्यातील जनतेला पडलेला आहे. शरद पवार यांनी महाराष्ट्रात तुफान उभे केले. त्यांना तुम्ही 10 जागा द्यायलाही तयार नाही. काहीतरी गडबड आहे, ती कळेल, असे म्हणत राऊतांनी या निकालाबाबत शंका उपस्थित केली. तर, हा जनतेचा कौल मान्य करायला तयार नाही. जय-पराजय होत असतो, हार-जीत होत असते, त्याविषयी काही म्हणायचे नाही. हा निकाल लावून घेतलेला आहे. या लावून घेतलेल्या निकालावर माझ्यासारख्या लोकशाही मानणाऱ्या माणसाचा विश्वास असू शकत नाही, असेही राऊतांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


Edited By Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -