घरताज्या घडामोडीराज्यपाल गुन्हेगारांना भेटतात कसे?, सोमय्यांच्या भेटीनंतर संजय राऊतांचा सवाल

राज्यपाल गुन्हेगारांना भेटतात कसे?, सोमय्यांच्या भेटीनंतर संजय राऊतांचा सवाल

Subscribe

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बुधवारी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीवर शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. राज्यपाल कोश्यारी गुन्हेगारांना भेटतातच कसे? असा सवाल संजय राऊत यांनी केला. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राऊत म्हणाले, सोमय्यांनी राष्ट्रपतींना भेटावं, त्यांनी गृहसचिवांना भेटावं. खरं म्हणजे राज्यपाल गुन्हेगारांना कसे भेटतात, हा प्रश्न आहे. आयएनएस विक्रांत घोटाळ्यात ज्याची चौकशी सुरु आहे. ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप आहे. ज्यांनी जनतेचे, देशाचे पैसे लुटले आहेत. आर्थिक गुन्हे विभाग तपास करत आहे, जो जामिनावर सुटला आहे. त्या आरोपीला राज्यपाल भेटतात, ही गंभीर गोष्ट आहे. राज्यपालांनी असं गुन्हेगारांना भेटणं ही महाराष्ट्राला काळईमा फासणारी घटना आहे. राजभवनामध्ये असं कधी घडलं नव्हतं, असं संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

राणांच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी व्हायला पाहिजे की नको

संजय राऊत यांनी नवनीत राणा आणि युसूफ लकडावाला यांच्यातील आर्थिक व्यवहार समोर आणले. त्यावरुन भाजप नेते मोहित कंबोज यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोटो शेअर केलेत. त्यावर राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. मी फक्त आर्थिक कनेक्शन बद्दल बोललो आहे. कोणाचे फोटो कोणाबरोबर, कोणासोबत चहा पितोय, कोण कोणाबरोबर जेवायला बसलंय त्याच्याशी माझा काही संबंध नाही. आर्थिक व्यवहार जी व्यक्ती ईडीच्या कोठडीत आहे. ज्या व्यक्तीचा मनी लाँड्रिंगसंदर्भात ईडी तपास करतंय, अशा व्यक्तीशी एक संशयास्पद व्यवहार समोर आला. हा मुद्दा तेवढ्यापुरता आहे. आता उगाचच कोणीतरी त्यांची वकीली करायची सुपारी घेतली असेल तर त्यांचा प्रश्न आहे. प्रश्न विचारला त्याचं उत्तर द्या. हा हिशेब काय आहे? हा आर्थिक व्यवहार कशासाठी आहे? यातलं गांभिर्य समजून घ्या. पण भाजरतीय जनता पार्टीचं कसं आहे हवेत गोळीबार फार करतात, एकही गोळी लागत नाही. त्यांना करु द्या, मला काहीही म्हणायचं नाही आहे. मुद्द्यावर बोला, तुम्ही महाविकास आघाडीचे नेते आहेत, मंत्री आहेत, त्यांच्याशी याच पद्धतीने काही मुद्दे समोर ठेवलेत ना, मग हा एक मुद्दा समोर ठेवल्यावरती तुम्ही एवढे बिचकताय कशाला? यांची चौकशी व्हायला पाहिजे की नको, हाच मुद्दा माझा आहे, असं संजय राऊत म्हणाले.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -