घरमहाराष्ट्रSanjay Raut : बाळराजांच्या वाढदिवसाला गुंडांची फौज, राऊतांनी साधला श्रीकांत शिंदेंवर निशाणा

Sanjay Raut : बाळराजांच्या वाढदिवसाला गुंडांची फौज, राऊतांनी साधला श्रीकांत शिंदेंवर निशाणा

Subscribe

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाला आलेले गुंड कोण होते? गृहमंत्री देंवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या दहशतीखाली आहेत का? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला आहे.

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस काल रविवारी (ता. 04 फेब्रुवारी) राज्यभरात त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी साजरा केला. मुंबईतही मोठ्या जल्लोषात त्यांचा वाढदिवस साजरा झाला. पण श्रीकांत शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आलेल्या काही व्यक्तींमुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी X या सोशल मीडिया हँडलवरील त्यांच्या अधिकृत अकाउंटवरून श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाचा एक फोटो पोस्ट करून प्रश्न उपस्थित केले आहेत. तर प्रसार माध्यमांशी बोलतानाही त्यांनी राज्यातील वाढत्या गुंडगिरीसाठी राज्य सरकारला जबाबदार धरले आहे. (Sanjay Raut raised questions on Srikant Shinde’s birthday)

हेही वाचा… Raut on Shrikant : श्रीकांत शिंदेंच्या वाढदिवसानिमित्ताने गुंड हेमंत दाभेकरने घेतली भेट; संजय राऊतांची सरकारवर टीका

- Advertisement -

प्रसार माध्यमांसमोर संजय राऊत म्हणाले की, बाळराजांचा वाढदिवस राज्यभर साजरा झाला. ते हाडवैद्य आहेत. त्यांना आम्ही खासदार केले. शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यामुळे ते खासदार झाले आहेत. काल त्यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा झाला. त्यांना आमच्याही शुभेच्छा आहेत. परंतु बाळराजे यांच्या खास माणसांवर भाजपा आमदार गोळीबार करत आहेत. त्यांच्या वाढदिवसाला गुंडांची फौज होती. त्यासंदर्भातील एक फोटो मी पोस्ट केला आहे. यासंदर्भात अनेक गुंडांचे फोटो आहे. हे गुंड कोण आहेत? त्याची पोलिसांनी चौकशी करावी, अशी मागणी राऊतांनी केली.

तर, गेल्या काही महिन्यांत अनेक गुंडांना जामिनावर तुरुंगाच्या बाहेर काढण्यात आले आहे. गुंडांचे संघटन बनवण्यासाठी पोलिसांवर जबाबदारी दिली गेली आहे. यासाठी एका माजी पोलीस अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आल्याचा आरोपही राऊतांनी प्रसार माध्यमांसमोर केला. तसेच, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कायद्याची चाढ असेल तर ते कायद्याने काम करतील. ते एकनाथ शिंदे यांच्या दहशतीखाली आहे का? हे त्यांनी सांगावे, असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला. त्यामुळे आता या प्रकरणावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. तर त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर केलेल्या या आरोपाला शिंदे गटाच्या नेतेमंडळींकडून काय प्रत्युत्तर देण्यात येते, हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

संजय राऊत यांनी यावेळी एका व्हिडीओचीही माहिती दिली. याबाबत ते म्हणाले की, शिंदे गटाचे खासदार परदेशात गेले होते. त्यांचा व्हिडिओ मला मिळाला आहे. तो व्हिडिओ लवकरच बाहेर येईल. शिंदे गँगचे खरे चरित्र काय आहे, हे समोर येईल. त्यासाठी वेट अँड वॉच, राऊत म्हणाल्याने खळबळ उडाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -