विरोधकांचं तोंड नसून गटार आहे, संजय राऊतांची टीका

shiv sena saamana editorial criticize bjp and shiv sena rebellion leaders

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची आज औरंगाबादमध्ये जाहीर सभा होणार आहे. परंतु विरोधी पक्षाकडून टीका टिप्पणी सुरू झालेली आहे. दरम्यान या सभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विरोधकांवर टीका केली आहे.

शिवसेनेची पहिली शाखा ३७ वर्षांपूर्वी स्थापन झाली. त्या पहिल्या शाखेचा वर्धापनदिन आहे. या वर्धापनदिनानिमित्त शिवसेनेची संभाजीनगरला भव्यदिव्य सभा आहे. या सभेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. सभेची तयारी गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. संपूर्ण मराठवाड्यातून लाखो सैनिक या सभेला येणार आहेत. कारण बऱ्याच काळानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईच्या बाहेर सभा घेत आहेत. राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत, यावर मुख्यमंत्री काय बोलणार याविषयी सर्वांना उत्सुकता आहे. आज संध्याकाळी राज्याचे मुख्यमंत्री औरंगाबादला पोहोचतील. तसेच ते सभेला संबोधित करतील.

विरोधकांचं तोंड नसून गटार आहे

औरंगाबादमध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे, यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, संजय राऊत म्हणाले की, हे विरोधकांचं तोंड नसून गटार आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांविषयी कसं बोलावं आणि काय बोलावं, याबाबत त्यांना भान नाहीये. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांबाबत व्यक्तिगत द्वेष असू शकतो. त्यांनी जे काही मोठं काम करून ठेवलं आहे. परंतु अशा प्रकारच्या तुमच्या तोंडातून जर भिजलेले फटाके फुटणार असतील तर त्याची पर्वा आम्ही करत नाही.

हेही वाचा : “एमआयएम आणि समाजवादीच्या दाढ्या कुरवळणारे…”; मनसेचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

घटकपक्ष आजही महाविकास आघाडीसोबतच

सरकार स्थापन करताना जे घटक पक्ष आमच्यासोबत होते. ते आजही आमच्यासोबत आहेत. कालच्या सभेतच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं की, एवढ्या मोठया सरकारमध्ये अशा लहानमोठ्या गोष्टी असतात. त्यांची जी काही कामं राहिली असतील तर त्यांची कामं पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाविकास आघाडीतला घटकपक्ष आजही महाविकास आघाडीसोबतच आहे. त्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे, असं राऊत म्हणाले.

१० तारखेला कळेलच कोण कोणाला मतदान करणार आहे. समाजवादी पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी आमची चर्चा झालेली आहे. शेवटी महाराष्ट्राचं सरकार हे किमान सामायिक कार्यक्रमावर चाललेलं आहे. त्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी एक राज्याच्या विकासाचा आराखडा तयार केलेला आहे, असं राऊत म्हणाले.


हेही वाचा : औरंगाबादमध्ये आज उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार, नामांतराच्या घोषणेची शक्यता?