घरताज्या घडामोडीRaut Vs Fadnavis : फडणवीसांच्या प्रश्नाला राऊतांनी दिले उत्तर, म्हणाले, मी मर्द...

Raut Vs Fadnavis : फडणवीसांच्या प्रश्नाला राऊतांनी दिले उत्तर, म्हणाले, मी मर्द शिवसैनिक…

Subscribe

मी तर खुलेपणाने चौकशीला तयार असल्याची घोषणा केली होती. कुठेही बोलवा, मी बोलवायला तयार आहे. पण संजय राऊत मात्र पत्रकार परिषद घेऊन मला का बोलावलय ? असा प्रश्न करत असतात, असे ते का म्हणतात ? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. फडणवीसांच्या या विधानावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत मर्द शिवसैनिक आहे. घाबरण्याचा प्रश्नच नाही, अशा भाषेत राऊतांनी या विधानाला उत्तर दिले आहे.

संजय राऊत जे म्हणाले, त्यांना मी सांगू इच्छितो की मला नोटीस आल्यावर मी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले. मला जरी प्रीव्हिलेज असल तरीही मी सांगितले की मी जाणार आहे. मला तर सरकारने विनंती केली की येऊ नका, पोलिसांनी सांगितले की आम्ही पोलीस पाठवतो. त्यामुळे आम्ही घाबरत नाही. पण संजय राऊतांवर अशी परिस्थिती आल्यावर ते का घाबरतात ? ते केंद्रीय तपास यंत्रणांविरोधात पत्रकार परिषद घेऊन का आरोप करतात ? मला का बोलावता अस ते का म्हणतात ? याच उत्तर त्यांनी दिली पाहिजे. या विधानाला संजय राऊत यांनी ट्विट करत उत्तर दिले आहे.

- Advertisement -

मुंबई पोलिसांनी चौकशीदरम्यान मला आरोपीसारखे प्रश्न विचारले – देवेंद्र फडणवीस

काय म्हणाले संजय राऊत ?

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ऐकण्यात व पहाण्यात काही तरी दोष निर्माण झालाय. संजय राऊत मर्द शिवसैनिक आहे. घाबरण्याचा प्रश्नच नाही. केंद्रीय तपास यंत्रणा किती खोटे पणाने कारवाया करतात याचा पोलखोल करण्यासाठी मी दोन पत्रकार परिषद घेतल्या.पुराव्यासह. इतकेही खोटे बोलू नका.

- Advertisement -

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -