केंद्राने आरोपींना वाचवण्याचे प्रयत्न केल्याने ठिणगी उडाली, राऊतांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

sanjay raut reaction on devendra fadnavis allegations about maharashtra bandh

महाविकास आघाडी सरकारकडून पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घणाघात केला आहे. महाराष्ट्र बंद हा राज्य सरकारचा ढोंगीपणा असल्याचे फडणवीस यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र बंद हा वैयक्तिक किंवा राजकीय फायद्यासाठी नव्हता असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजप आणि मनसेकडून जर या बंदला विरोध करण्यात आला असेल तर त्यांनी शेतकऱ्यांच्या हत्येला पाठिंबा दिला हे स्पष्ट असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या मंत्राला जागून बंद करण्यात आला हा राज्य सरकारने पुकारलेला बंद नसून संतापलेल्या विरोधी पक्षांनी पुकारलेला बंद असल्याचेही संजय राऊतांनी म्हटलं आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीशी साधलेल्या संवादामध्ये महाराष्ट्र बंद महाविकास आघाडी सरकारचा निर्णय नव्हता हे स्पष्ट केलं आहे. हा बंद शेतकऱ्यांच्या हत्येच्या निषेधार्थ सर्वच विरोधी पक्षांकडून पुकारण्यात आला असल्याचे राऊत यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र बंदमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससह आणखी पक्ष होते. हा महाराष्ट्र सरकारने बंद केला नव्हता तर सर्व विरोधी पक्षांनी मिळून बंद केला होता. विविध पक्षांनी लखीमपुर घटनेचा निषेध केला. निषेध करुन देखील सरकार ऐकत नव्हते उलट हत्यारे आहेत त्यांना वाचवण्याचे प्रयत्न करण्यात आला त्यामुळे संतापाची ठिणगी देशात उडाली. महाराष्ट्र नेहमीच अन्यायाविरोधात लढत आलेला प्रदेश आहे.

विशेषता शेतकऱ्यांच्या बाबत या सगळ्या घटनांकडे मूकपणे पाहणे या राज्याच्या प्रतिष्ठेला शोभा देणारे नाही. या राज्याने न्यायासाठी लढणारे अनेक नेते दिलेत. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे अन्याय सहन करु नका. बाळासाहेबांच्या मंत्राला जागून हा बंद पुकारला लखीमपुर घटनेचं समर्थन कोण कसं करु शकेल. तो आक्रोश होता त्या आक्रोशाने अनेकांची काळीज हेलावताना आजही दिसतात असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्र बंद लादला नाही

शिवसेना बंदमध्ये सहभागी असते तिथे काही लादावं लागत नाही. का लादाव? हा बंद व्यक्तीगत फायद्यासाठी किंवा राजकीय फायद्यासाठी बंद नव्हता. तुमच्या भाजपशासित राज्यात तिथल्या लखीमपुर खीरी भागात शांततेत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने ठरवून गाडीने चिरडला त्यामुळे जो संताप उसळला त्याची धग महाराष्ट्राला लागली त्यामुळे महाराष्ट्र बंद पुकरला असल्याचे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

इतिहासात प्रथमच मंत्रिमंडळ बैठकीचा दुरुपयोग

महाराष्ट्रात संविधानाची पायामल्ली करणं चाललं आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची ज्यांच्यावर जबाबदारी आहे. ते कॅबिनेटमध्ये निर्णय करतात. मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करुन महाराष्ट्र बंदचा निर्णय जाहीर होतो. देशाच्या इतिहासामध्ये मंत्रिमंडळ बैठकीचा दुरुपयोग अजूनही कोणी केला नाही. एक प्रकारे संपुर्ण संवेधानिक व्यवस्थेला आव्हान देण्याचे काम या महाविकास आघाडी सरकारकडून चालू असल्याचे फडणवीस यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रातील सरकारला आंदोलन करण्याची नैतिकता आहे का? असा खोचक सवाल फडणवीस यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकारचा ढोंगीपणा असून आता ढोंगीपणा जगासमोर उघड झाला असल्याचे फडणवीस यांनी म्हटलं आहे. लखीमपुरच्या घटनेसाठी महाराष्ट्र बंद करण्यात येतो. परंतु राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नव्या पैशाची मदत करत नाही. महाराष्ट्रातील शेतकरी संकटात आहे. हे सरकार सत्तेत आल्यापासून २ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.


हेही वाचा : मावळमध्ये नेत्याच्या मुलाने गोळीबार केला नव्हता, जितेंद्र आव्हाडांचे फडणवीसांना प्रत्युत्तर