घरताज्या घडामोडीUPA अध्यक्षाबद्दल एकत्र बसून ठरवले पाहिजे, फडणवीसांच्या आरोपांना मोदींनी उत्तर दिलं -...

UPA अध्यक्षाबद्दल एकत्र बसून ठरवले पाहिजे, फडणवीसांच्या आरोपांना मोदींनी उत्तर दिलं – संजय राऊत

Subscribe

महाराष्ट्र मॉडेलचे श्रेय मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांना

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी मुसंडी मारली ही त्यातल्या त्यात जमेची बाजू आहे. भविष्यामध्ये या देशात विरोधी पक्षाची भक्कम आघाडी उभी करावी आणि एक आव्हान उभे करावे असे सर्वांची इच्छा आहे. या आघाडीचा आत्मा नक्कीच काँग्रेस पक्ष आहे. काँग्रेसपक्षाशिवाय कोणतीही आघाडी उभी राहू शकत नाही. आसाममध्ये काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळाले आहे. परंतु सत्तेत येऊ शकले नाही. केरळ, तामिळनाडूमध्ये थोडफार यश मिळाले आहे. पण काँग्रेला अजून मुसंडी मारणे गरजेचे आहे. देशाला भक्कम आघाडी उभ करण्याची गरज आहे. जसे महाराष्ट्रात महाविकास आघाडी आहे. कालच शरद पवार यांच्यासोबत याविषयी चर्चा झाली आहे. परंतु त्यांची प्रकृती बरी नसल्यामुळे ते मुंबईत आहेत. लवकरच यामध्ये हालचाली सुरु होतील असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

राष्ट्रीय स्तरावर मविआ सारखी आघाडी हवी

आघाडीच्या नेतृत्वाबद्दल संजय राऊत यांनी म्हटले आहे की, मी कुठे म्हटले नवीन नेतृत्व प्रत्येकाला वाटत आपणच नेता आहे. जसे महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांना नेता केले आणि सरकार उत्तम चालले आहे. देशातली ही एक आदर्श आघाडी आहे. तीन भिन्न विचारांचे पक्ष एकत्र आले याचे नेतृत्व हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत आहेत. आदर्श अशी ही व्यवस्था आपण निर्माण केली आहे. राष्ट्रीय स्तरावरही अशा प्रकारची एक व्यवस्था आपल्याला निर्माण करावी लागेल. सगळ्यांनी एकत्र यावे अशे मी मत व्यक्त केले आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र मॉडेलचे श्रेय मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांना

महाराष्ट्र मॉडेल हा संदर्भ वारंवार गेल्या १ महिन्यापासून देत आहोत. याच महाराष्ट्र मॉडेलचा संदर्भ सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. आता त्याच महाराष्ट्र मॉडेलवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रतिक्रिया दिली आहे. म्हणजे महाराष्ट्र पुढे आहे या कोरोनाच्या लढाईत, स्वतःची लढाई स्वतःच्या बळावर लढली आहे. याचे श्रेय राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यातील सर्व नेत्यांना द्यावे लागेल सर्व काम करत आहेत.

आज पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत पुण्यातील तीन कोविड हॉस्पिटलचे उद्घाटन केले. हे सरकारी नसून शिवसेनेची कोविड सेंटर आहेत. महाराष्ट्राची स्थिती चांगली आहे कारण सरकारला समांतर असे कोविड सेंटर राजकीय कार्यकर्तेसुद्धा करत आहेत. त्याच्यामुळे सरकारवरचा भाग कमी होत आहे. इतर राज्यात हे झाले नाही. त्यांना शिवेसेनेसारखे काम जमले नाही त्यामुळे इतर राज्यात चिता पेटताना दिसत आहेत.

- Advertisement -

फडणवीसांना मोदींकडूनच उत्तर

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे विरोधक आहेत. राज्य सरकारवर टीका करणे, विरोध करणे त्यांचे काम आहे. राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा लपवला जात आहे. असा त्यांचा आरोप आहे. परंतु महाराष्ट्र मॉडेलचे कौतुक करुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना उत्तर दिले असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -