घरमहाराष्ट्रमहाराष्ट्रात सध्या सरकार कुठे आहे? राऊतांचा सवाल

महाराष्ट्रात सध्या सरकार कुठे आहे? राऊतांचा सवाल

Subscribe

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ आज बुलढाण्यात धडाडणार आहे. बुलढाण्यातील चिखली येथे उद्धव ठाकरे शेतकरी मेळाव्याला संबोधित करणार आहे, त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष्य लागलं आहे. उद्धव ठाकरेंच्या या बुलढाणा दौऱ्याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच राज्यातील विविध मुद्द्यावरून उद्धव ठाकरे समाचार घेणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान यावर महाराष्ट्रात जे काही चाललं आहे त्यावरून संतप्त वातावरण आहे. यात सरकार आहे कुठे? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.

ठाकरे हेच सरकार

राऊत म्हणाले की, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे बुलढाण्यात शेतकऱ्यांच्या भेटीला जात आहे. सरकार महाराष्ट्रात असल्याचा शेतकऱ्यांचा काही बरा वाईट परिणाम होत नाही. पण ठाकरे हेच सरकार आहे. आणि आम्ही सगळे आज उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बुलढाण्यात शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी जात आहे. बुलढाण्यात जाहीर सभा, शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. अनेक विषयांवर शिवसेना पक्षप्रमुख आपली भूमिका व्यक्त करतील.

- Advertisement -

राज्यपालांसह सर्वांचा समाचार घेतला जाईल 

विशेषत: ज्याप्रकारे महाराष्ट्राचा अपमान महाराष्ट्राचा अपमान कर्नाटकचे मुख्यमंत्री असतील, छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात राज्यपाल आणि भाजपचे प्रवक्ते असतील यासगळ्यांचा समाचार आज घेतला जाईल. महाराष्ट्रातून अनेक राजकीय पक्ष आणि विरोधी पक्षांचा पाठींबा मिळत आहे. भारतीय जयहिंद पक्षाचे नेते आले आणि त्यांनी सुद्धा आपला पाठिंबा जाहीर केला. अशी माहिती राऊतांनी दिली आहे.

तिथे बेईमानांना अजिबात थारा देणार नाहीत

महाराष्ट्रात जे काही चाललं आहे त्यावरून संतप्त वातावरण आहे. सरकार आहे कुठे? पण आज इथे बोलण्यापेक्षा आम्ही बुलढाण्यातील सभेत बोलू, ही सभा ऐतिहासिक होईल, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा वीर पुरुष ज्या मातीने आम्हाला दिला, ती राष्ट्रमाता जिजाऊ, यांच्या भूमीमध्ये आजची सभा आहे. त्या भूमीमध्ये फक्त निष्ठा आणि इमान याचेचं बीज रोवलं गेल आहे. तिथे बेईमानांना अजिबात थारा देणार नाहीत. मग विदर्भ असेल, मराठवाडा असेल अशा राष्ट्रमाता जिजाऊच्या भूमीत विराट सभा होत आहे. असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला.


तिथेच सणसणीत कानाखाली का नाही दिली?; राऊतांचा अमृता फडणवीसांना सवाल

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -