घरताज्या घडामोडीशिवसेनेचा पहिला नगरसेवक, आमदार फडणवीसांच्या जन्माच्या आधीचे - संजय राऊत

शिवसेनेचा पहिला नगरसेवक, आमदार फडणवीसांच्या जन्माच्या आधीचे – संजय राऊत

Subscribe

राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या स्थापनेआधीच नगरसेवक आणि आमदार निवडून आला होता, अशा शब्दात टीका केली होती. खासदारकीची निवडणूकही शिवसेनेने भाजपच्या चिन्हावर लढवली होती, अशा शब्दात त्यांनी टीका केली होती. त्यावर शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेच्या जन्मापासून ते पहिल्या महापौरापासून ते आमदार निवडून आल्याचा इतिहास त्यांनी समोर ठेवला. तसेच राम मंदिराच्या आंदोलनात शिवसेनेचे काय योगदान होते, याबाबतचाही खुलासा त्यांनी केला.

शिवसेनेची कुंडली

भाजपचा जन्म हा १९८० च्या दशकात झाला, जेव्हा जनता पक्षाचे पतन झाले. शिवसेनेचा जन्म हा १९६९ सालाचा आहे. शिवसेनेचा पहिला महापौर या शहरामध्ये हेमचंद्र गुप्ते. ते कधी झाले, किती नगरसेवक निवडून आले, याबाबतचे एखादे अभ्यास शिबिर रामभाऊ म्हाळगीत ठेवू. शिवसेनेचे पहिले आमदार वामनराव महाडिकही त्याच काळात म्हणजे शिवसेनेच्या स्थापनेनंतर निवडून आले. गिरगावात प्रमोद नवलकर हे निवडून आले होते. माझगावातून छगन भुजबळ आले होते. आमचे वाघ हे अनेकदा मुंबईतून निवडून आले. देवेंद्र फडणवीस यांचा मुंबईशी आणि महाराष्ट्राच्या राजकारणाशी त्यावेळी संबंध नसेल. कारण या सगळ्या गोष्टी देवेंद्र फडणवीस यांच्या जन्माच्या आधीच्या आहेत.

- Advertisement -

कोर्ट मुर्ख होत का ?

राम मंदिरासाठीच्या आंदोलनाचा इतिहास आहे, दस्तावेज आहे, सीबीआय कोर्टासमोरचे साक्षीपुरावे आहेत. बाळासाहेबांची साक्ष आहे. बाळासाहेब आणि लालकृष्ण अडवाणी हे आरोपी होते. ते कोर्ट मुर्ख होत का ? असाही सवाल त्यांनी केला. शेकडो कारसेवक त्या काळात मुंबईतून गेले. त्यांना कोणताही राजकीय पक्ष त्यावेळी नव्हता. अनेक प्रमुख नेते त्यावेळी गेले होते. कोण कुठून निघाले याची यादी आम्ही सामनात दिली होती. सेना भवनात आम्ही वॉर रूम तयार केली होती. अयोध्येच्या राम जन्मभूमीच्या लढ्याचे योगदान हे एतिहासिक योगदान आहे. जेव्हा रामजन्मभूमीचा लढा थंड पडला होता, तेव्हा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आम्ही अयोध्येत गेलो होतो. अयोध्येशी संबंध काय हे रामाला माहिती आहे.

पाच वर्षे औरंगजजेबाला कवटाळून बसला का ?

आपणही पाच वर्षे मुख्यमंत्री होतात, तेव्हा औरंगाजेबाला कवटाळून बसला होता का ? असाही सवाल त्यांनी केला. आपण हिंदुत्ववादी होता ना आमच्यासोबत. एखाद्या शहराचे नाव बदलण्यासाठी केंद्राची परवानगी लागते. केंद्राने परवानगी का दिली नाही ? हे विचारावे लागेल. आपण मुख्यमंत्री असताना विचारावे का वाटले नाही ? योगींनी प्रयागराज करून घेतले, तर फडणवीसांनी का करून घेतले नाही. आम्ही बाळासाहेबांना संभाजीनगर झाल्याचे सांगितले होते, आमच्या हिशोबाने ते झालेले आहे.

- Advertisement -

बाळासाहेबांचे व्यक्तीमत्व हे खूप महान आहे. कोणी ट्विट करून श्रद्धांजली किंवा आदरांजली एवढ्यापुरते ते मर्यादित नाही. हल्ली फडणवीस हे गोव्यात आहेत. त्यामुळे अतिशय बेशिस्त आणि भ्रष्ट सरकार असे ते गोव्याबद्दल बोलत असावेत. गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक होते त्यांनीही गोव्याबद्दल भ्रष्ट आणि बेशिस्त असा उल्लेख केला आहे. सध्या गोवा विधानसभेला माफिया, भूमाफिया, दलाल, भ्रष्ट उमेदवार आहे. तर मनोहर पर्रीकर यांच्या कुटुंबातूनच बंड झालेले आहे. त्यांच्या डोक्यात कदाचित गोव्याचे सरकार फिरते आहेत.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -