घरताज्या घडामोडीचोर कंपनीला clean cheat आणि राजकीय विरोधकांची चौकशी हाच...संजय राऊत

चोर कंपनीला clean cheat आणि राजकीय विरोधकांची चौकशी हाच…संजय राऊत

Subscribe

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक व्हिडीओ ट्विट करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी महाविकास आघाडीच्या मोर्चाचा एक व्हिडीओ शेअर केला होता. परंतु हा व्हिडीओ महाविकास आघाडीच्या मोर्चाचा नसून मराठा मोर्चाचा आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच संजय राऊत अधूनमधून असं करत असतात, असा टोलाही फडणवीस यांनी राऊतांना लगावला. मात्र, संजय राऊतांनी पुन्हा एकदा ट्विट करत देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे.

- Advertisement -

मराठा मोर्चा देखील महाराष्ट्र स्वाभिमान.. न्याय हक्कांसाठी निघाला. शिवरायांचा जयघोष करीत त्याच मार्गावरून त्याच ताकतीने निघाला.तेव्हा देखील आजच्या प्रमाणे विराट मोर्चाची चेष्टा दबक्या आवाजात हेच लोक करीत होते. दोन्ही मोर्चे महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखवणारे होते. तूर्त इतकेच!, असे संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

- Advertisement -

मराठा मोर्चाच्या गर्दीचा व्हिडीओ संजय राऊतांनी ट्विट केला, त्याची चौकशी करणार असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. परंतु राऊतांनी पलटवार करत ट्विट केला आणि म्हणाले की, मराठा मोर्चा ही सुद्धा महाराष्ट्राची ताकत होती आणि आहे. महविकास आघाडी मोर्चात ही ताकत सहभागी झालीच होती. करा चौकशी! आपल्या चोर कंपनीला clean cheat देणे आणि राजकीय विरोधकांची चौकशी करणे हाच या सरकारचा एक कलमी कार्यक्रम झालाय! डरो मत!, असं संजय राऊत म्हणाले.


हेही वाचा : शिंदे गटातील 40 आमदारांची बुद्धी नॅनो, मात्र फडणवीस प्रगल्भ…; सत्ताधाऱ्यांच्या टीकेचा राऊतांकडून


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -