घरताज्या घडामोडीमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा पक्ष संघटनेची; संजय राऊत यांची माहिती

मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा पक्ष संघटनेची; संजय राऊत यांची माहिती

Subscribe

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा करणार - संजय राऊत

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाली. या भेटीनंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधलाय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संघटनात्मक चर्चा केली, संघटना वाढी संदर्भात, नेत्यांसंदर्भात, उपाययोजना आणि उपक्रम योजनासंदर्भात चर्चा केली असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच मी जेव्हा भेटतो तेव्हा संघटनात्मक विषयांवरच चर्चा करतो असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच मराठा आरक्षणासंदर्भात शिवसेना खासदार संसदेत चर्चा करणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मराठा आरक्षणावर संसदेत चर्चा करणार असल्याची माहिती दिली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा आहे. या आठवड्यात मराठा अधिवेशनावर चर्चा करणार असल्याचे सांगितले आहे. मराठा आरक्षणावर चर्चा करावी लागेल जी घटनात्मक तरतूद आहे. घटनादुरुस्ती करताना जो पर्यंत ५० टक्क्यांची मर्यादा वाढवली जात नाही तोपर्यंत राज्य आणि केंद्र सरकार काही करु शकणार नाही. याबाबत चर्चा करु असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

अशोक चव्हाण बैठक घेणार

शिवसेना खासदार संजय राऊत यांना मराठा आरक्षणासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावर संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, मराठा आरक्षणासंदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चर्चा केली आहे. या प्रकरणातील सविस्तर माहिती आणि घटनात्मक दृष्ट्या काय करायला पाहजे याबाबत अशोक चव्हाण ऑनलाईन माध्यमातून बैठक घेऊन सगळ्यांना माहिती देणार आहेत.

राहुल गांधींच्या भेटीबाबत माहिती दिली होती

काँग्रेस माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांची संजय राऊत यांनी दिल्लीत भेट घेतली होती. या भेटीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटीपुर्वीच माहिती दिली असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. या भेटीचा तपशील मुख्यमंत्र्यांना राऊत यांनी सांगितला असल्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात तासभर चर्चा झाली असून अनेक राजकीय विषय आणि संसदेतील अधिवेशनाबहाबत चर्चा केली असल्याची शक्यता आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -