Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र उद्धव ठाकरेंना एकटं पाडण्याचा राऊतांचा डाव; नितेश राणेंचा घणाघात

उद्धव ठाकरेंना एकटं पाडण्याचा राऊतांचा डाव; नितेश राणेंचा घणाघात

Subscribe

उद्धव ठाकरेंना एकटं पाडण्याचा राऊत डाव रचताहेत का? असा सवाल करत भाजप नेते नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

संजय राऊत जेव्हा राष्ट्रवादीत प्रवेश करतील तेव्हा त्यांचे खरे मनसुबे उद्धव ठाकरेंना कळतील. ठाकरेंना तेव्हा कळेल की राऊतांसाठी त्यांनी किती लोकांना तोडलं आहे. शरद पवार यांनी जेव्हा राजीनामा दिला तेव्हा त्यांना देशभरातील अनेक मोठ्या नेत्यांचे फोन आले पण उद्धव ठाकरेंनी पवार यांना फोन करुन राजीनामा मागे घ्या, असं सांगितल्याचं वृत्त कुठेच आलं नाही. शरद पवार यांनी ज्यादिवशी राजीनामा दिला तेव्हा उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे शरद पवार यांची भेट घेणार होते, अशा बातम्या होत्या. पण ती भेट काही झाली नाही, मग हे काय षड्यंत्र आहे. उद्धव ठाकरेंना एकटं पाडण्याचा राऊत डाव रचताहेत का? असा सवाल करत भाजप नेते नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. ( Sanjay Raut’s plan to isolate Uddhav Thackeray BJP leader Nitesh Rane’ s allegations )

ठाकरे- पवार भेट राऊत होऊ देत नाहीत 

शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर, उद्धव ठाकरे त्यांची भेट घेणार होते परंतु संजय राऊतने त्यांची भेट होऊ दिली नाही. का त्यांची भेट होऊ देत नाहीत राऊत? स्वत: मात्र चार-चार वेळा जाऊन पवारांची भेट घेतात, असं म्हणत राणे यांनी राऊतांवर उद्धव ठाकरेंना एकटं पाडण्याचा डाव आखल्याचं बोललं आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र एकीकरण समिती काँग्रेस विरुद्धदेखील लढत आहे. परंतु संजय राऊत हे केवळ भाजप विरोधात बोलून आले, त्यामुळे राऊतांनी काँग्रेसची दलाली थांबवावी. कारण महाराष्ट्र एकीकरण समितीने काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांची देखील सभा उधळली होती.

राऊतांनी आजच्या सामना पेपरमधील रोखठोकमध्ये लिहिलंय की मी कर्नाटक निवडणूक प्रचाराला गेलो होतो आणि विमानतळावर उतरलो तर सगळी सुरक्षा पंतप्रधानांसाठी केली आहे. लोकांचा पैसा पंतप्रधानांच्या रोड शो साठी उधळला जात आहे. त्याचा खर्च विराचला जात नाही पण विरोधकांकडून हिशोब घेतला जातो, असं राऊत म्हणाले तर मग राऊतांना प्रश्न आहे की, ठाकरे सरकार होत तेव्हा आदित्य ठाकरे दावोसला गेले होते त्याचा खर्च कोणी केला? त्याचं स्पष्टीकरण द्या, असं म्हणत राणेंनी राऊतांवर हल्लाबोल केला आहे.

- Advertisement -

- Advertisment -