घरमहाराष्ट्रराजकीय स्वार्थासाठी भाजपा सावरकरवादी; संजय राऊतांचा ‘रोखठोक' हल्लाबोल

राजकीय स्वार्थासाठी भाजपा सावरकरवादी; संजय राऊतांचा ‘रोखठोक’ हल्लाबोल

Subscribe

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच ढळवून निघाले आहे. अशात आज सामना ‘रोखठोक’मधून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सावरकरांविषयीच्या भूमिकावर हल्लाबोल केला आहे. वीर सावरकरांवर नाहक टीका करुन राहुल गांधी यांनी वादळ ओढवून घेतले. ‘भारत जोडो’ यात्रेचा तो अजेंडा नव्हता. भारतीय जनता पक्ष सावरकरांच्या अपमानाविरुद्ध रस्त्यावर उतरला. सावरकरप्रेमाचे हे ढोंगच म्हणावे लागेल. संघ सावरकरांचा कठोर टीकाकार राहिला, पण आज राजकीय स्वार्थासाठी भाजप सावरकरवादी झाला, असा आरोप सामनातून रोखठोकमधून करण्यात आला आहे.

सावरकरांनी (Vinayak Savarkar) 10 वर्षे अंदमानच्या काळय़ा पाण्यावर नरकयातना भोगल्या. त्या देशासाठीच होत्या याचा विसर पडू नये! असंही पुढे राऊत यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

अटकेत असलेला कोणताही बंदी त्याच्या सुटकेसाठी हरतरहेचे कायदेशीर प्रयत्न करत असतो. 10 वर्षांपेक्षा जास्त काळ अंदमानात नरकयातना (देशासाठी) भोगल्यावर सावरकरांनी ‘डावपेच’ म्हणून दिलगिरी व्यक्त करून सुटकेचा मार्ग निवडला असेल तर त्यास शरणागती-माफीनामा म्हणता येणार नाही. आज ‘ईडी’सारख्या स्वतंत्र हिंदुस्थानातील तपास यंत्रणांच्या भयाने भले भले एका रात्रीत ‘स्वदेशी’ सरकारला शरण जातात. पक्ष बदलतात. स्वतःच्या निष्ठा विलीन करतात, अशा शब्दात बंडखोर आमदारांना संजय राऊत यांनी टोला लगावला आहे.

सावरकरांनी दशकभर अंदमानात ज्या यातना सहन केल्या त्या राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवाहलाल नेहरूंना लक्ष्य केले, तर राहुल गांधी वीर सावरकरांना लक्ष्य करीत आहेत. स्वातंत्र्य लढ्यात दोघांचे योगदान तोलामोलाचे आहे. सावरकरांनी तर सर्व सुखाचा त्याग करून अंदमानचा मार्ग स्वीकारला. पुन्हा तुरुंग काय असतो याची कल्पना नसलेले सावरकरांच्या सुटकेवर बोलतात तेव्हा आश्चर्य वाटते. सावरकरांचे वंशज एरवी कोठे दिसत नाहीत. राहुल गांधींनी सावरकरांवर वक्तव्य केले की, त्यांचा चेहरा वृत्तवाहिन्यांवर दिसतो. आठ वर्षांपासून भाजपचे राज्य केंद्रात आहे, पण सावरकरांना ‘भारतरत्न’ने सन्मानित करून माफीचा डाग धुऊन काढावा असे ढोंगी सावरकर भक्तांना वाटत नाही, असं राऊत म्हणाले.

- Advertisement -

वीर सावरकरांचे क्रांतिकार्य महान होते, पण आज भाजपास सावकराप्रेमाचा जो उमाळा आलाय ते सरळ सरळ ढोंग आहे, असा आरोपही सामनातू करण्यात आला आहे. यासोबत पंतप्रधान मोदी नेहरुंच्या बदनामीची भूमिका सोडत नाहीत. राहुल गांधींनी सावरकरांना त्याच कारणासाठी पकडले, हा देशाचा अजेंडा नाही, अशाने भारत कसा जोडणार? असा सवाल शेवटी राऊतांनी उपस्थित केला आहे.


छत्रपती शिवरायांवर आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी आव्हाडांचा संताप, भाजपा नेत्यावर निशाणा

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -