घरमहाराष्ट्रशिवसेनेच्या मुख्यनेतेपदावरून संजय राऊतांची हकालपट्टी, गजानन कीर्तिकरांनी स्वीकारला पदभार

शिवसेनेच्या मुख्यनेतेपदावरून संजय राऊतांची हकालपट्टी, गजानन कीर्तिकरांनी स्वीकारला पदभार

Subscribe

नवी दिल्ली – शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह शिंदे गटाकडे गेल्याने शिंदे गटातील शिवसेनेत कार्यकारिणीत बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या मुख्यनेते पदी असलेल्या संजय राऊत यांची हकालपट्टी करण्यात आली असून त्यापदी शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

१७ फेब्रुवारी रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला. या निर्णयानुसार शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला मिळालं. त्यानंतर, २१ फेब्रुवारी रोजी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत गजानन कीर्तिकर यांची मुख्यनेता म्हणून नियुक्ती झाली. यासंदर्भातील पत्र शिवसेना संसदीय पक्षाचे नेते राहुल शेवाळे यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले होते. त्यानुसार, गजानन कीर्तिकर यांची मुख्यनेते पदी नियुक्ती झाली असल्याचे कळवण्यात आले होते. यामुळे संजय राऊत यांच्याकडील हे पद गेले आहे.

- Advertisement -

शिवसेनेच्या खासदारांनी संसदेतील शिवसेना कार्यालयात गजानन कीर्तिकर यांचा सत्कार केला. यावेळी राहुल शेवाळे, श्रीकांत शिंदे, बुलढाण्याचे प्रतापराव जाधव, कोल्हापूरचे संजय मंडलिक, हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने उपस्थित होते.

shivsena

- Advertisement -

हेही वाचा – निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर संसदेतील शिवसेना कार्यालयाचे चित्र बदलले

संसदेतील कार्यालय शिंदे गटाला

शिवसेना कार्यालयही शिंदे गटाला मिळाले आहे. संसदेतील शिवसेना कार्यालयात शिंदे आणि ठाकरे गटाकडून वापरण्यात येत होता. वाद सुरू झाल्यानंतरही दोन्ही गटातील सदस्य एकाच कार्यालयात बसत होते. परंतु, आता लोकसभा सचिवालयाने शिवसेना शिंदे गटाला हे कार्यालय दिले आहे.

हेही वाचा संसदेतील शिवसेना कार्यालय शिंदे गटाला बहाल, उपसचिवांनी शेवाळेंना लिहिले पत्र

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -