घरताज्या घडामोडीकाँग्रेसचं शक्तिप्रदर्शन नसून तो भाजपविरोधातील संताप....संजय राऊत

काँग्रेसचं शक्तिप्रदर्शन नसून तो भाजपविरोधातील संताप….संजय राऊत

Subscribe

देशात जे खर बोलतात त्यांच्याविरोधात ईडी, सीबीआय आणि आयकरला पाठी लावण्यात येते. आम्हीसुद्धा त्याचे पीडित आहोत. हे शक्तिप्रदर्शन नाही. परंतु राहुल गांधी आणि सोनिया गांधी चौकशीला जाणार असतील तर कार्यकर्ते आंदोलन करणारच. त्यांच्या मनात चीड निर्माण झाली आहे.

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी काँग्रेस माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांना ईडीने समन्स पाठवले असून मंगळवार १३ जून रोजी चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. राहुल गांधींना चौकशीला बोलवल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्लीत आंदोलन केलं आहे. काँग्रेसचे हे शक्तिप्रदर्शन असल्याची टीका करण्यात येत होती. परंतु हे शक्तिप्रदर्शन नसून कार्यकर्ते आणि जनतेमध्ये संताप असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनासुद्धा ईडीने समन्स पाठवले आहे. केंद्राकडून विरोधकांचा छळ सुरु असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरुन भाजपवर निशाणा साधला आहे. माध्यमांशी संवाद साधताना राऊतांना काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या चौकशीप्रकरणी प्रश्न विचारण्यात आला होता. यावर राऊत म्हणाले की, भाजपचे जे विरोधक आहेत. त्यांना केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून त्रास देण्याचं जे षडयंत्र आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीने नोटीस पाठवल्या आहेत. नॅशनल हेरॉल्डचा स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास भाजपने तपासला पाहिजे. समजून घेतला पाहिजे. ज्या पद्धतीने विरोधकांचा छळ सुरु आहे. तो देशाला आणि लोकशाहीला खड्ड्यात घालणारा आहे, असे संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

देशात जे खर बोलतात त्यांच्याविरोधात ईडी, सीबीआय आणि आयकरला पाठी लावण्यात येते. आम्हीसुद्धा त्याचे पीडित आहोत. हे शक्तिप्रदर्शन नाही. परंतु राहुल गांधी आणि सोनिया गांधी चौकशीला जाणार असतील तर कार्यकर्ते आंदोलन करणारच. त्यांच्या मनात चीड निर्माण झाली आहे.

देवेंद्र भुयार यांच्या भावना मुख्यमंत्र्यांकडे मांडणार

देवेंद्र भुयार भेटले होते. त्यांच्याबाबत वक्तव्य केले होते. मी त्यांची भूमिका ऐकली ते प्रामाणिकपणे बोलत होते एवढं मला वाटले. त्यांच्या भावना मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.

- Advertisement -

आदित्य ठाकरे १५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर

आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यासाठी अयोध्यामध्ये चाललो आहोत. १५ तारखेला आदित्य ठाकरे अयोध्येला पोहोचतील. लखनऊवरुन ते हैदराबादला येतील, अयोध्यामध्ये येतील. पत्रकार परिषद घेतील. राम लल्लाचे दर्शन घेऊन राम मंदिराचे बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणाला भेट देतील. गर्भगृहाला भेट देतील. तेथील इस्कॉनच्या मंदिराला भेट देणार आहेत. तसेच शरयूच्या काठी महाआरती होणार आहे. राजकीय नसेल आम्ही सहभागी असलो तरी राजकीय शक्तिप्रदर्शन नाही. श्रद्धेमुळे आम्ही अयोध्यामध्ये जात असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.


हेही वाचा : राऊतांकडून आचारसंहितेचं उल्लंघन, किरीट सोमय्या कारवाईच्या मागणीसाठी दिल्ली दौऱ्यावर

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -