येणाऱ्या सगळ्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार, संजय राऊतांचे वक्तव्य

sanjay raut said Mahavikas Aghadi will fight all the upcoming elections together
लढण्यासाठी आम्हाला भाडोत्री लोक लागत नाहीत; राऊतांचा राजे ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला

राज्यातील येणाऱ्या सर्वच निवडणुका महाविकास आघाडी सरकार एकत्र लढणार असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. आगामी काही दिवसांमध्ये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. सगळ्या निवडणुका एकत्र लढण्याबाबत महाविकास आघाडी सरकारचे एकमत झाले असल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीसुद्धा एकत्र लढणार असल्याची माहिती दिली आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना महाविकास आघाडी सरकार येणाऱ्या सर्व निवडणुका एकत्र लढणार असल्याची घोषणा केली आहे. राऊत म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेक निवडणुका आम्ही जिंकलो आहे. महाविकास आघाडी सरकारचा प्रयोग महाराष्ट्रात नाही तर देशात यशस्वी झाला आहे. मुळे भविष्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच काय इतर निवडणुकाही, राष्ट्रीय स्तरावरच्या या एकत्र लढण्यासंदर्भात तीन पक्षात एकमत होत असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत.

आमच्याही मर्सिडीज आहेत – राऊत

पर्यावरण मंत्री आदित्य यांना मर्सिडीज बेबी म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला होता. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. पुण्यातील सभेत संबोधित करताना राऊतांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. मराठी माणसाच्या मर्सिडीज असायला हव्यात. परंतु त्या कष्टाच्या असाव्यात, चोरीच्या नसाव्यात अशा शब्दात राऊतांनी फडणवीसांवर टीकास्त्र डागलं आहे.

केंद्र सरकारची महाराष्ट्रासोबत द्वेष भावना

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून हे सरकार अडीच महिन्यात पडणार, पत्त्याच्या बंगल्यासारखं हे सरकार कोसळेल असे विरोधक सांगत होते. परंतु अद्याप महाविकास आघाडी सरकार उत्तम काम करत आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर महाविकास आघाडी सरकारविरोधात करण्यात येत आहे. केंद्र सरकार सूड भावनेने वागत असते. सूडापोटी महाराष्ट्राला कोणते सहकार्य केंद्र सरकार करत नाही असेही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : मुंबईतील नाले सफाईच्या कामाची होणार पोलखोल, साॅफ्टवेअर ठेवणार कामांवर लक्ष