घरमहाराष्ट्रमविआचं 'पॉवर' सेंटर 'सिल्वर ओक'च असेल, सरकार २५ वर्ष टीकेल - संजय...

मविआचं ‘पॉवर’ सेंटर ‘सिल्वर ओक’च असेल, सरकार २५ वर्ष टीकेल – संजय राऊत

Subscribe

शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्वर ओक या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना महाविकास आघाडी सरकार पुढी २५ वर्ष टीकेल आणि त्याचं पॉवर सेंटर हे सिल्वर ओक असेल, असं संजय राऊत म्हणाले. तसंच, महाराष्ट्रात आग लावण्याचे प्रयत्न अमरावतीपासून एसटी संपापर्यंत चालले आहेत, असे आरोप केले.

संजय राऊत यांनी शरद पवार यांची सिल्वर ओकवर भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांच्यासोबत अनेक विषयांवर चर्चा झाल्याचं राऊत म्हणाले. महाराष्ट्रातील विषय, राजकारण, एसटी संपाबाबत चर्चा झाली, असं राऊत म्हणाले. तसंच, पुढे बोलताना त्यांनी परमबीर सिंह प्रकरणावर प्रश्न विचारले असता परमबीर सिंह संदर्भात शरद पवार यांच्याशी चर्चा करावी एवढा गंभीर विषय नाही. पवार यांच्याशी राज्यातील गंभीर विषयांवर चर्चा होते. इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही आणि आमच्याकडे पण वेळ नाही. अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

- Advertisement -

एसटीचा विषय लवकर सुटेल

एसटीचा विषय गंभीर आहे असं जरी वाटत असलं तरी तो विषय लवकर सुटेल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. एसटी संपाबाबत शरद पवार यांची जी भूमिका आहे त्यासंदर्भात परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या बोलण्यातून मला असं वाटतंय काही तरी तोडगा लवकर निघेल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्राला आग लावण्याचे प्रयत्न

महाराष्ट्रातलं वातावरण कोण भडकवतंय, का भडकवतंय, त्यामागे हेतू काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे. एसटीच्या संपात तेल का आणि कोण ओततंय, याची माहिती आमच्याकडे आहे. महाराष्ट्राला आग लावण्याचे प्रयत्न अमरावतीपासून एसटी संपापर्यंत चालले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात सर्वांना सहानभुती आहेत. जे जे यांच्यासाठी करता येईल ते सरकार करत आहे. सोमवारी शरद पवार, अनिल परब आणि अजित पवार यांच्यात बैठक पार पडली. त्यांच्या बैठकीतून समजलं की सकारात्मक सूचना दिल्या आहेत, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -