तिन्ही पक्षाने दोन वर्षांत चांगलं काम केलं; तिन्ही नेते लवकरच पुढील निर्णय घेतली – राऊत

Sonia gandhi, Sharad Pawar and Uddhav Thackeray
तिन्ही पक्षाने दोन वर्षांत चांगलं काम केलं; तिन्ही नेते लवकरच पुढील निर्णय घेतली - राऊत

राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार चांगलं काम करत असून ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा पुनरुच्चार शिवेसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी केला. तसंच एखाद्या विषयावर मतभेद असू शकतात, मात्र नाराजी अजिबात नाही, असं संजय राऊत म्हणाले. याशिवाय, तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून लवकरच पुढील निर्णय घेतील, असं राऊत यांनी सांगितलं.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ईडी चौकशीवरुन संजय राऊत यांनी संतप्त सवाल केले. तसंच, अनिल देशमुख यांच्याविषयी मुख्यमंत्र्यांशी बोललो. अनिल देशमुख यांची एक बाजू आहे. ती समजून घेतली पाहिजे. त्यातले बरेच विषय मी सुद्धा समजून घेतले आहेत. प्रताप सरनाईक यांचीही बाजू समजून घेतली पाहिजे. त्यांच्यावर आरोप लावून ईडी किंवा केंद्रीय तपास यंत्रणा त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्रकारचे आरोप भापपाच्या लोकांवर कधी झाले नाहीत का? तिथे सगळे धुतल्या तांदळाप्रमाणे आहेत का? ते सगळे हरिश्चंद्राचे अवतार आहेत का? बाकी सगळे हरामखोर आहेत का याचा राज्यातल्या ११ कोटी जनतेनं विचार करण्याची वेळ आली आहे. लवकरच त्यासंदर्भात मुख्यमंत्री, शरद पवार, काँग्रेसचे नेते एकत्र बसून पुढील पावलं टाकतील असं दिसतंय, असं संजय राऊत म्हणाले.

…पण हे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार

राज्यात शिवसेना आणि भाजप युतीचं समीकरणं पुन्हा कधीच दिसणार नाही, असं तुम्ही ठामपणे सांगू शकता का? असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे टिकेल, असा विश्वा पुन्हा एकदा व्यक्त केला. “मी हे ठामपणे सांगू सकतो की, राज्यातील महाविका आघाडी सरकार पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल. पाच वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतील,” असं संजय राऊत म्हणाले.

भाजपमध्ये सगळे हरिश्चंद्राचे अवतार आहेत का?

अनिल देशमुख यांची एक बाजू आहे. ती समजून घ्यायला हवी. भाजपच्या लोकांवर कधी असे आरोप झाले नाहीत का? सगळे धुतल्या तांदळासारखे आहेत का? ते सगळे हरिश्चंद्राचे अवतार आहेत का? बाकी सगळे हरामखोर आहेत का? अशी प्रश्नांची सरबत्ती संजय राऊत यांनी भाजपवर केली.