Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र गुन्हा दाखल करण्याची भाषा करणाऱ्यांना शिवचरित्र पाठवू - संजय राऊत

गुन्हा दाखल करण्याची भाषा करणाऱ्यांना शिवचरित्र पाठवू – संजय राऊत

कोथळा बाहेर काढण्याच्या वक्तव्यावर गुन्हा दाखल करण्याच्या इशाऱ्यावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोथळा बाहेर काढण्याच्या वक्तव्यावरुन शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यावर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून गुन्हा दाखल करण्याची भाषा करणाऱ्यांना शिवचरित्र पाठवू, असं राऊत म्हणाले. कोथळा काढणं म्हणजे काय ते समजून घ्यावं, असा सल्ला देखील राऊत यांनी दिला आहे.

संजय राऊत यांच्याविरोधात पुण्यात गुन्हे दाखल करण्याच्या तयारीत भाजपचे नेते आहेत. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. मी असं काय केलं की तक्रार दाखल करावी. कोणाचा कोथळा बाहेर काढू असं मी म्हटलं, असा सवाल राऊत यांनी केला. “चंद्रकांत पाटील म्हणाले पाठीत खंजीर खुपसलं. त्यावर म्हटलं पाठीत खंजीर खुपसण्याची परंपरा महाराष्ट्राची नाही. आपण समोरुन वार करतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी समोरुन वार केले. यात नेमकं कोणाविरोधात खटला दाखल करतायत त्याची माहिती घ्यावी लागेल. त्यांना आम्ही शिवरित्र पाठवू, शिवचरित्र त्यांनी वाचलं पाहिजे,” असं राऊत म्हणाले.

- Advertisement -

“या शिवचरित्रांचा अभ्यास करुन कोथळा काढणं म्हणजे काय याचा अभ्यास केला तर आम्ही चर्चा करु. मी एक इतिहासाचा अभ्यासक आहे. आम्ही नुसतं राजकारण करत नाही. आम्ही इतिहास समजून घेतो. इतिहास घडवण्याचा प्रयत्न करतो. इतिहास चिवडत बसत नाही,” अासं राऊत म्हणाले.

 

- Advertisement -