तिथूनच खरी ठाकरे सरकार -राज्यपालांमध्ये ठिणगी पडली, संजय राऊतांनी सांगितले कारण

Goa Assembly Election 2022 sanjay raut says goa elections steering of maha aaghadi govt hand of uddhav thackeray

महाविकास आघाडी आणि राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यामधील वाद पुन्हा समोर आला आहे. राज्याच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांच्या निवडीचा कार्यक्रम राज्यपालांना देण्यात आला होता. यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अद्याप प्रत्युत्तर दिलं नाही यावरुन राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात लेटर वॉर सुरु झाला आहे. परंतु राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यामध्ये नक्की कधी ठिणगी पडली याबाबतची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्यपालांच्या भूमिकेवरुन वक्तव्य केलं आहे. राऊत म्हणाले की, राज्यपाल अनेक वर्ष राजकारणात असून ते संघाचे प्रचारक म्हणून सेवा देत आहेत. त्यांची माझी एका लग्नसोहळ्यात भेट झाली. त्यांची बाजू देखील बरोबर आहे. त्यांच्यावर दबाव आहे. पण हा दाबव कोणाचा आहे त्याबाबत त्यांनी स्पष्ट केले पाहिजे. राज्य सरकारकडून १२ राज्यपाल नियुक्त सदस्यांची फाईल पाठवली होती. यावर राज्यपालांनी अद्याप सही न केल्यामुळे राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात ठिणगी पडली असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत. राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय स्वीकारणे हे राज्यपालांना बंधनकारक असतं. परंतु १२ सदस्यांच्या फाईलवर सही न झाल्यामुळे केंद्रातून दबाव आणला जात आहे का? असा प्रश्न पडला होता असे संजय राऊत यांनी सांगितले. तसेच राज्यपालांवर दबाव आणून काम करणं आमच्या सरकारचा मान्य नाही असेही राऊत म्हणाले आहेत.

मुख्यमंत्र्यांची प्रकृती उत्तम

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती अत्यंत उत्तम आहे. विधानसभेचं कामकाज अत्यंत सुरळीत पार पडलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जबाबदारी होती. तसेच त्यांनी टोले देत -टोले घेत. अत्यंत उत्तम प्रकारे अधिवेशन पार पडलं. त्यामुळे मला असं वाटतं की, मुख्यमंत्र्यांचं संपूर्ण अधिवेशनावर लक्ष होतं. मुख्यमंत्र्यांची तब्येत आता बरीचशी सुधारली आहे. काही त्यांच्यावर निर्बंध आहेत. तर काही पत्थे आहेत. मुख्यमंत्र्यांची तब्येत बरी झाल्यानंतर ते नेहमीच्या कामाला लागतील. विधानसभेत जरी मुख्यमंत्री नसले तरी ते संपूर्ण कामकाज चांगल्यारित्या पार पाडत होते. अजित पवार यांच्याकडे जबाबदारी होती. ती पूर्णपणे त्यांनी पार पाडली असे संजय राऊत म्हणाले आहेत.


हेही वाचा : विद्यापीठ कायद्यातील बदलावरुन ठाकरे सरकारविरोधात एल्गार, मुनगंटीवारांकडून जनतेला सहभागी होण्याचे आवाहन