Friday, April 16, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र कोर्टाच्या निकालाचा अभ्यास करु, मुख्यमंत्री हायकोर्टाच्या निकालावर बोलतीलच - संजय राऊत

कोर्टाच्या निकालाचा अभ्यास करु, मुख्यमंत्री हायकोर्टाच्या निकालावर बोलतीलच – संजय राऊत

देशातील कोणतीही तपास यंत्रणा परमेश्वर नाही - राऊत

Related Story

- Advertisement -

संपूर्ण निकालाचा अभ्यास करावा लागेल सरकारला एक विधी व न्याय खाते असते गृहमंत्री स्वतः कायदा खाते सांभाळतात त्याच्यामुळे जे काही निकाल पत्र आहे. त्याबाबत सरकार अभ्यास करेल माझे काही व्यक्तिशा संबंध नाही आहे. महाविकास आघाडीम्हणून म्हणा या संपूर्ण प्रकरणावर सरकारतर्फे वक्तव्य केले पाहिजे. मुख्यमंत्र्यांपर्यंत हा विषय गेला असेल ह्या विषयावर ते बोलतील किंवा त्यांच्या तर्फे इतर कोणी बोलेल. पुर्ण निकाल काय आहे तो अजून आम्ही पाहिलेला नाही. मीडियाच्या माध्यमातून जी काही माहिती दिली ती आम्ही पाहिली आहे. परंतु अपुऱ्या माहितीवर विसंबूर राहून कोणतीही प्रतिक्रिया देता येणार नाही. कारण हा हायकोर्टाचा निर्णय आहे. हे प्रकरण पुर्णतः न्यायप्रविष्ठ आहे. आणि निर्णय घेणे सरकारने किंवा कोणत्याही पक्षाने हे योग्य नसल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हायकोर्टाने सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ माजली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी तातडीची बैठक घेण्यात आली होती. यावर संजय राऊत यांनी म्हटले आहे की, प्रत्येक पक्षाचा अंतर्गत विषय असतो. त्यासंदर्भात काही घडत असेल तर त्यावर दुसऱ्या पक्षातील नेत्याने बोलणे हे योग्य नाही. या देशात कोणतीही तपास यंत्रणा म्हणजे परमेश्वराचा अवतार नसतो. तपास हा त्या त्या पद्धतीने होत असतो. ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय तपास यंत्रणांवर काही स्ट्रिक्चर पास केले आहेत. परंतु न्यायालयाच्या कोणत्याही निर्णयासमोर मान झुकवतो आणि आदर करतो.

- Advertisement -

एकनाथ खडसेंवर आरोप करण्यात आले होते. समिती स्थापन करण्यात आली होती. यानंतर खडसेंना नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यायला लावला होता. आता अनिल देशमुख राजीनामा देणार का यावर उत्तर देताना राऊतांनी म्हटले आहे की, हे न्यायालयीन चौकशीचे आदेशन नाहीत निकाल पत्र पुन्हा एकदा समजून घ्या, कोर्ट ६ वाजता बंद होते आज किंवा उद्या निकालपत्र सादर होईल ते एकदा वाचले पाहिजे त्याचे अध्ययन केले पाहिजे. कारण न्यायालयीन चौकशी असे काही नाही न्यायालयासमोर प्रकरण गेले आहे. न्यायालयाने त्यावर टिप्पणे दिले आहेत. चौकशीच्या संदर्भातले काही आदेश दिले असतील तर सरकार निर्णय घेईल असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संपूर्ण मंत्रिमंडळ या क्षणी महाराष्ट्राच्या कोरोनाशी लढण्यात व्यस्थ आहेत. यापुढे सर्वात पुढे संकट कोरोनाची लढाई आहे. त्यामुळे याविषयावर कोणाशी काही बोलणे झाले नाही. मुख्यमंत्री आणि सरकारने यावर वेळोवेळी भूमिका मांडलेली आहे. मुख्यमंत्री हे शरद पवार, सोनिया गाधी आणि राहूल गांधी यांच्याशी चर्चा करत असतात आणि मग निर्णय घेत असतात असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.

- Advertisement -