Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रSanjay Raut : एकनाथ शिंदेंना बाळासाहेब ठाकरे माहिती आहेत का? राऊतांची मुख्यमंत्र्यांवर...

Sanjay Raut : एकनाथ शिंदेंना बाळासाहेब ठाकरे माहिती आहेत का? राऊतांची मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका

Subscribe

एकनाथ शिंदेंना बाळासाहेब ठाकरे माहिती आहेत का? खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर सडकून टीका

मुंबई : आज हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा 12 वा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर स्मृतीस्थळावर जाऊन बाळासाहेबांना अभिवादन केले आहे. यावेळी त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे तसेच खासदार अनिल देसाई यांच्यासह अनेक जण उपस्थितीत होते. तसेच याच दरम्यान खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे. एकनाथ शिंदेंना बाळासाहेब ठाकरे माहिती आहेत का? असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे. शिवसेना शिंदे गटाने वृत्तपत्रात जाहिरात देऊन ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेनेने एका वृत्तपत्रात जाहिरात दिली असून, मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, असा आशय त्या जाहिरातीत आहे. त्यामुळे राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केल्याचे दिसून आले आहे.

(Sanjay Raut On CM Eknath Shinde.)

- Advertisement -

हेही वाचा : Nayanthara News : धनुषनं नयनताराला पाठवली 10 कोटींची नोटीस, नयनतारा म्हणाली…

शिवसेनेने एका वृत्तपत्रात बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त जाहिरात दिली आहे. त्यामध्ये मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, असा आशय आहे. त्यावरून राऊतांनी मुख्यमंत्र्यांना चांगलेच सुनावले आहे. ते म्हणाले, बाळासाहेब ठाकरेंनी कधीही काँग्रेसचा तिरस्कार केला नाही. त्यांनी नेहमी इंदिरा गांधी, राजीव गांधींना राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्रात कायम एकोपा राहिल याची त्यांनी काळजी घेतली.

- Advertisement -

हेही वाचा : Haryana Crime : शिक्षिकेच्या खुर्चीखाली बॉम्ब ठेवून रिमोटने उडवला, 13 विद्यार्थ्यांवर कारवाई

महाराष्ट्रामध्ये सध्या विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुका आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने लढत आहोत. कारण ज्या कार्यासाठी शिवसेनेची स्थापना बाळासाहेबांनी केली. महाराष्ट्राचे आरक्षण मुंबईचे रक्षण, मराठी माणसाचा स्वाभिमान अभिमान हे सगळे गेले अडीच वर्षात संकटात आहे. महाराष्ट्रावर गुजरातने ज्याप्रकारे आक्रमक केले आणि त्यांच्या कुटुंबातील काही लोक गुजरातची लाचारी करत आहेत. हा विचार बाळासाहेब ठाकरे यांचा नव्हता, असेही यावेळी ते म्हणाले आहेत. तसेच बाळासाहेबांनी आम्हाला संघर्ष करायला शिकवले. बाळासाहेबांनी आम्हाला संकटावर मात करायला शिकवलं, असेही यावेळी म्हणाले आहेत.

यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फणवीसांवर देखील टीका केल्याचे पाहायला मिळाले आहे. ही देवेंद्र फडणवीस यांच्या अस्तित्वाची लढाई आहे आणि महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आहे. ते त्यांच्या अस्तित्वासाठी लढत आहेत कारण त्यांचा अस्तित्व गेल्या अडीच वर्षात पूर्णपणे संपवले आहे. महाराष्ट्र राज्याची ही निवडणूक आहे. या राज्यात सर्व सुरळीत चालले असताना फक्त भारतीय जनता पक्षाला त्यांचा पराभव दिसत आहे. म्हणून जात धर्म हिंदू मुसलमान बोट जिहाद वगैरे वगैरे विषय त्यांनी आणले, असे म्हणत राऊतांनी फडणवीसांना सुनावले आहे.


Edited By komal Pawar Govalkar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -