Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रSanjay Raut : पाच तारखेपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री काय करतील सांगता येत नाही;...

Sanjay Raut : पाच तारखेपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री काय करतील सांगता येत नाही; काय म्हणाले राऊत?

Subscribe

मुंबई : काळजीवाहू मुख्यमंत्री सध्या मनाने खचले आहेत. त्यांचे मानसिक आणि शारिरीक संतुलन बिघडलेले आहे, त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न खासदार संजय राऊतांनी उपस्थित केला आहे. तसेच पाच तारखेपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री काय करतील याचा भरवसा नसल्याचे देखील यावेळी खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. (Sanjay Raut On CM Eknath Shinde.)

हेही वाचा : Margashirsha Religious Tips : मार्गशीर्ष महिन्यात दक्षिणावर्ती शंखाची पूजा करण्याचे महत्त्व

- Advertisement -

काळजीवाहू मुख्यमंत्र्यांची प्रकृती बिघडली तर त्याला जबाबदार कोण असे अनेक गंमतीशीर विषय सध्या चर्चेत आहेत. तसेच सध्या त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य मावळले आहे. त्यांचा चेहरा पडलेला आहे. ते हसत नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावर हसू मावळलेले आहे. त्यांच्या डोळ्यात चमक दिसत नाहीत. तसेच मुख्यमंत्री फक्त म्हणत आहेत मी लाडका भाऊ मात्र तुम्ही आता मोदी शहांचे लाडके राहिलेले नाही, असा टोला संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे. तुम्ही आता देवेंद्र फडणवीसांचे पण लाडके राहिले नाही, असेही ते म्हणाले आहेत. काळजीवाहू एकनाथ शिंदेंना उपचारांची गरज आहे. सहकाऱ्यांनी त्यांच्यांवर योग्य ते उपचार करायला पाहिजे. कारण भारतीय जनता पक्ष हा नाग आहे. आम्हाला ही अशाच पद्धतीने त्यांनी डंख मारला, असेही ते म्हणाले आहेत. राज्याला हा विषारी नागांचा विळखा पडलेला आहे, तो कसा सोडवायचा याचा आम्ही लोकशाही मार्गाने विचार करू, असेही ते म्हणाले आहे.

हेही वाचा : Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी अमित शाहांसमोर ठेवलेत ‘हे’ तीन पर्याय, अन्यथा…

- Advertisement -

गेल्या अनेक दिवसांपासून फडणवीस मुख्यमंत्री होणार अशी माहिती समोर येत आहे. पहिल्या दिवसापासून हे सुरु आहे. पण तो दिवस अजून उजाडत नाही. अजून हा महिना संपायचा आहे. नोव्हेंबर आता संपेल नंतर डिसेंबर उजाडेल. त्यानंतर ५ तारीख येईल. तोपर्यंत आमचे काळजीवाहू मुख्यमंत्री काय करतील सांगता येत नसल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत.


Edited By Komal Pawar Govalkar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -