घरमहाराष्ट्रकोरोना रोखायचा असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांप्रमाणे देशाला काम करावं लागेल - संजय...

कोरोना रोखायचा असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांप्रमाणे देशाला काम करावं लागेल – संजय राऊत

Subscribe

देशातील सर्वात मोठं शहर असलेल्या मुंबईतील कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व सूत्रे हातात घेतली त्यामुळेच आता मुंबईसारख्या शहरात कोरोना रुग्णांची संख्या निम्म्यावर आली आहे. मुख्यमंत्री ज्याप्रकारे कोरोनाची परिस्थिती हाताळत आहेत, त्याचं श्रेय त्यांना द्यावंच लागेल. महाराष्ट्राचा पॅटर्न दिल्लीत वापरला जात आहे. त्यामुळे देशातील कोरोना रोखायचा असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांप्रमाणे देशाला काम करावं लागेल, असं शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाचे कौतुक केलं. देशातील मोठं शहर असलेल्या मुंबईमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत आहे. कारण जिल्ह्याचे प्रशासक, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या सगळ्यांनी आपल्या हातात सूत्रे घेतली आहेत. संपूर्ण यंत्रणेवर मुख्यमंत्री बारीक लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्राचा पॅटर्न दिल्लीत राबवला जात आहे, असं संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

कोणत्याही युद्धात सेनापती हा प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाऊन लढत नाही. तो वॉररुममध्ये बसून विजय मिळवून देतो. उद्धव ठाकरे यांनीही एकाच ठिकाणी बसून अगदी गावपातळीपर्यंत सर्व उपाययोजना राबवल्या जात आहेत की नाही, हे पाहिले. त्यामुळे राज्यातील कोरोना आटोक्यात आणण्याचे श्रेय त्यांना दिलेच पाहिजे, असं राऊत म्हणाले. यावेळी त्यांनी फडणवीस यांच्या पत्रावर भाष्य केलं. विरोधकांनी आता टीका करणं बंद करावं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहलं. या पत्रातील अनेक सूचना उत्तम असून राज्य सरकार त्याचा नक्कीच गांभीर्याने विचार करेल, असं संजय राऊत म्हणाले.

गेल्या ५-१० वर्षात देश २० वर्ष मागे गेलाय

गेल्या ५-१० वर्षात देश २० वर्ष मागे गेलाय, असं संजय राऊत म्हणाले. गेल्या पाच-दहा वर्षात देश किती पुढे गेला हे माहिती नाही. पण कोरोना संकटामुळे देश २० वर्षे मागे गेला आहे. देशातील अनेक यंत्रणा कोलमडून पडल्या असून आता अनेकांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागेल, असं संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -