घरताज्या घडामोडीमराठा आरक्षणासह ११ विषयांसाठी पंतप्रधान मोदींची भेट घेणार, संजय राऊत यांची माहिती

मराठा आरक्षणासह ११ विषयांसाठी पंतप्रधान मोदींची भेट घेणार, संजय राऊत यांची माहिती

Subscribe

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी शिवसेनेच्या सर्व खासदारांची बैठक पार पडली.

शिवसेना खासदार संजय राऊत संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी दिल्लीत आहेत. सर्व खासदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मराठा आरक्षण आणि इतर ११ महत्त्वाच्या विषयावर पाठपुरावा करण्यासाठी भेट घेणार असे संजय राऊत यांनी सांगितले आहे. तसेच मराठा आरक्षणावर अभ्यास कमी पडला असल्याची टीका विरोधकांनी केली होती यावर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मराठा आरक्षणा द्या आणि मग शिकवा अशी टीका राऊत यांनी केली आहे. तसेच संसदेत राज्याच्या विकासकामांवर चर्चा करण्यासाठी सर्व खासदारांची बैठक झाली असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी शिवसेनेच्या सर्व खासदारांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी राऊतांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. विरोधकांनी पहिले मराठा आरक्षण द्यावे आणि नंतर शिकवावे अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. तसेच मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण आणि राज्याच्या विकासासंदर्भात काही विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. सर्व खसादरांना राज्यातील विषयांवर त्या त्या मंत्र्यांच्या भेटी घेऊन पाठपुरावा करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.

- Advertisement -

पंतप्रधान मोदींची भेट घेणार

शिवसेना नेते संजय राऊत शिवसेनेच्या सर्व खासदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे सांगितले आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, राज्यातील विकास कामे, मेट्रो, ब.ल.ड्र.क पार्क, पीक विमा अशा विषयांचा व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदींची भेट घेऊन मांडलेल्या ११ विषयांचा पाठपुरावा करणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.

दानवेंकडे शिकवणी लावू

केंद्रीय रेल्वेमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी सत्ताधाऱ्यांची शिकवणी कमी पडली असल्याची खोचक टीका केली होती. यावर संजय राऊत यांनी प्रत्युत्त दिलं आहे की, त्यांची शिकवणी लावू जर मराठा आरक्षणाचा विषय सुटत असेल तर आम्ही त्यांच्याकडे शिकवणी लावू असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सकाळी भेट घेतली त्यांनी आरक्षणाबाबत कायदेशी बाबींवर चर्चा केली. त्यामुळे शिकवणी आणि अभ्यासाच्या गोष्टी आम्हाला सांगू नका आरक्षण द्या आणि मग आम्हाला शिकवा असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -