घरमहाराष्ट्रनाशिकअद्वय हिरेंवरील कारवाई राजकीय दबावातून, संजय राऊतांचे सरकारवर गंभीर आरोप

अद्वय हिरेंवरील कारवाई राजकीय दबावातून, संजय राऊतांचे सरकारवर गंभीर आरोप

Subscribe

शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणावरून खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर निशाणा साधत गंभीर आरोप केले आहेत.

मुंबई : मालेगाव येथील रेणुकादेवी सहकारी सुतगिरणी उभारणीसाठी नाशिक जिल्हा बँकेकडून घेतलेल्या कर्ज रकमेत घोटाळा केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांना काल बुधवारी (ता. 15 नोव्हेंबर) पहाटे भोपाळ येथून अटक करण्यात आली. नाशिक ग्रामीण पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. परंतु, ही कारवाई राजकीय दबावातून आणि सूडाच्या राजकारणातून करण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाकडून आणि विशेषतः खासदार संजय राऊत यांच्याकडून करण्यात येत आहे. अद्वय हिरे यांच्यावर अटकेची कारवाई केल्यानंतर राऊतांनी पुन्हा एकदा सरकारमधील मंत्री दादा भुसे, भाजप आमदार राहुल कूल यांच्यावरून सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. (Sanjay Raut serious accusations against government, action against Advaya Hire is due to political pressure)

हेही वाचा – स्वस्ताई आणि ‘अच्छे दिन’ हे आजही जनतेसाठी स्वप्नच, ठाकरे गटाची भाजपावर कडाडून टीका

- Advertisement -

शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांच्यावर कारवाई केल्याप्रकरणी संजय राऊतांनी सरकारवर निशाणा साधत म्हटले की, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आणि मुंबईसह महाराष्ट्र व्हायलाच पाहिजे, या मताचे जे प्रमुख नेते महाराष्ट्रात होते, त्यात भाऊसाहेब हिरे होते. त्या भाऊसाहेब हिरे यांचे अद्वय हिरे हे नातू आहेत. हिरे कुटुंबाला फार मोठी परंपरा लाभली आहे. पण अद्वय हिरे यांना झालेली अटक ही राजकीय दबावतंत्राचा एक भाग आहे. अद्वय हिरे यांच्यावर जे आरोप आहेत, ते त्यांच्यावर भाजपमध्ये असताना आणि त्याआधी देखील होते. पण ते शिवसेनेत आले. त्यानंतर त्यांनी मालेगाव विधानसभेत उद्धव ठाकरे यांची सभा घेतली. संपूर्ण मतदारसंघ ढवळून काढला. त्यामुळे त्या मतदारसंघात ज्यांना पराभवाची भीती वाटत आहे, अशा मंत्रिमहोदयांनी शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून अद्वय हिरे आणि त्यांच्या कुटुंबियांवर गेल्या वर्षभरात 40 च्या आसपास गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती राऊतांकडून देण्यात आली आहे.

दादा भुसे यांच्यावर गिरणा सहकारी साखर कारखान्यात शेतकऱ्यांचे शेअर्स घेऊन त्याची अफरातफर केल्याचा आरोप आहे. गिरणा बचावच्या नावाखाली भुसेंनी 178 कोटी गोळा केले होते. त्याचे काय झाले? त्यासंदर्भात तपास यंत्रणा, ईडी, सीबीआय यांच्याकडे रितसर तक्रार दाखल करण्यात आली आहे. पण दादा भुसे यांच्यावर त्याच मालेगावमध्ये काय कारवाई झाली?. त्याशिवाय राहुल कुल जे भाजपचे आमदार आहेत, त्यांनी भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यात घोटाळा केल्याचे अनेक पुरावे देण्यात आले आहेत. याबाबतचे पुरावे तपास यंत्रणा आणि गृहखात्याला देण्यात आले आहेत. 500 कोटींचे या साखर कारखान्यात मनी लॉंडरिंग झाले आहे. याबद्दल ईडी, सीबीआय आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुरावे दिले. तिथे आजही शेतकरी आंदोलन करत आहे, असे सांगत पुन्हा एकदा संजय राऊत यांनी घोटाळ्याच्या आरोपांवरून राहुल कूल आणि दादा भुसे यांना लक्ष केले आहे.

- Advertisement -

तसेच, 70 हजार कोटींचा शिखर बँक घोटाळा झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात. ते अजित पवार आज मंत्रीमंडळात आहेत. तेच अजित पवार गृहमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून दिल्लीत बसले होते. हसन मुश्रीफ यांनी संत संताजी घोरपडे कारखान्यात घोटाळा केल्याचा आरोप भाजपाने केला. त्यानंतर मुश्रीफ जामीनावर सुटले आहेत. ईडी, सीबीआयची प्रकरणे असलेली शिवसेनेची लोक सरकारमध्ये आहेत. या लोकांवर कुठलीही कारवाई होत नाही. पण, अद्वय हिरेंना अटक करून सरकारने दाखवून दिले की आम्ही सुडाचे आणि दबावाचे राजकारण करणार आहे. अद्वय हिरेंनी मालेगावची विधानसभा लढू नये, म्हणून दबाव होता. अद्वय हिरेंच्या पाठिशी संपूर्ण शिवसेना आहे. अद्वय हिरे हे एकटे नाही, ही लढाई आम्ही लढू आणि जिंकू. ज्याप्रमाणे नाशिक ग्रामीण पोलिसांनी केली आहे, त्याची नोंद आम्ही घेतली असल्याचे एक प्रकारचा इशाराच संजय राऊत यांच्याकडून देण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -