घरElection 2023Sanjay Raut : तीन राज्यांतील BJP विजयानंतर शिवसेना नेते म्हणाले- "आम्ही EVM...

Sanjay Raut : तीन राज्यांतील BJP विजयानंतर शिवसेना नेते म्हणाले- “आम्ही EVM जनादेश स्वीकारला”

Subscribe

इंडिया आघाडीच्या मुंबई बैठकीत कपिल सिब्बल आणि दिग्विंजय सिंह यांनी EVMसंदर्भात संशय व्यक्त केला होता, असे संजय राऊतांनी सांगितले होते.

मुंबई : देशातील चार राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आला आहे. यातील मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपाला विजय मिळाला आहे. कालचा निकाल अनपेक्षित जरी असले तर आम्ही लोकशाही माणणारे लोक आहोत, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. तीन विधानसभेच्या विजयानंतर संजय राऊतांनी इव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे.

तीन राज्यांत भाजपाच्या विजयावर संजय राऊत म्हणाले, “चार राज्यांच्या निकालानंतर भाजपाची ताकद वाढणार आहे, या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, “चार राज्यांचे निकाल हाती आले आहे. निकाल अनपेक्षित असला तरी आम्ही लोकशाही माणणारे लोक आहोत. लोकशाहीत जनादेश जरी आपल्या विरोधात गेला. तरी फार अकांड तांडव न करता. जनादेश स्वीकारायचा असतो आणि लोकशाहीचा सन्मान करायचा असतो.”

- Advertisement -

हेही वाचा – Telangana Result : तेलंगणात काँग्रेसची एकहाती सत्ता, राज्यपालांची घेतली भेट

मध्य प्रदेश आणि छत्तीसगड पण इव्हीएमचा जनादेश

संजय राऊत म्हणाले, “देशातील चार पैकी तीन राज्यात निवडणुकीत भाजपाला विजय मिळाला आहे. यामुळे इव्हीएम किंवा बॅलेट पेपर माध्यमातून जो जनादेश मिळाला आहे. तो ही आम्ही लोकशाहाचा आदेश मानतो. मग इव्हीएमवर विश्वास असो वा नसो. कालच्या निकालानंतर आजही लोक धक्कातून सावरलेली नाही. खास करून मध्य प्रदेश आणि छत्तीसगड पण इव्हीएमचा जनादेश आहे. आज मिझोरामचा निकाल येईल, पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपाला मोठे यश मिळाले आहे. ते जिंकले आहे तर आम्ही त्यांचे अभिनंदन करतोय, मग मोदी, शहा आणि नड्डा असो.”

- Advertisement -

हेही वाचा – Mizoram Assembly Election Result 2023 : इंदिरा गांधीचे सुरक्षा प्रमुख मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत सर्वात पुढे

दिग्विंजय सिंहाने इव्हीएमवर व्यक्त केला संशय

इव्हीएमसंदर्भात संजय राऊत म्हणाले, “काल चार राज्यांच्या निकालात तीन राज्य भाजपाकडे गेली. एक राज्य तेलंगणा काँग्रेसकडे केले. मध्य प्रदेशचे निकाल फक्त आश्चर्यकार नाही तर धक्कादायक आहे. इंडिया आघाडीच्या मुंबईच्या बैठकीत झाली. त्यावेळाला दिग्विंजय सिंह मुंबईत होते. दिग्विंजय सिंह यांची भूमिका होती. इव्हीएम संदर्भात इंडिया आघाडीची चर्चा व्हावी. हे सगळे संशयास्पद आहे. कपिल सिब्बल आणि दिग्विंजय सिंह यांची अशी भूमिका होती की, इव्हीएम कसे मोजणी केली जाते. यासंदर्भात इंडिया आघाडीचे प्रेसेंटेशन व्हावे, अशी त्यांची भूमिका होती. त्याला काही संशय होता. तेव्हा आम्ही म्हटले की, आपण किती काही म्हटले तरी आताचे सरकार त्यावर काही चर्चा करणार नाही. आपण पुढे जाऊ या. मी कालच पाहिले की दिग्विंजय सिंह म्हणाले की, मी पहिलेच सांगितले होते. हे तर सहा महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. मी निकालावर दोष देत नाही पण काही लोकांच्या मनात लोकशाहीच्या निर्णयावर शंका असेल तर निवडणूक आयोगाने दखल घेतली पाहिजे. चार राज्याचे निकाल हे इव्हीएमचा जनादेश आहे आणि तो स्वीकारला पाहिजे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -