शरद पवारांनी केलेल्या विधानावरुन इतरांची घालमेल का? – संजय राऊत

ShivSena MP Sanjay Raut

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचे नातू पार्थ पवार यांना फटकारल्यानंतर राजकीय वर्तुळात बरीच चर्चा सुरु आहे. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांनी केलेल्या विधानावरुन इतरांची घालमेल का? असा सवाल केला आहे. पार्थविषयी पवारांची टिप्पणी हा राष्ट्रवादीचा अंतर्गत विषय आहे. दुसऱ्या पक्षातल्या लोकांना सल्ला देण्याचा मला अधिकार नाही, असं संजय राऊत म्हणाले.

पक्षाची धुरा सांभाळणाऱ्यांना अनेकदा ‘कटू’ बोलावे लागते. शिवसेनाप्रमुखांनी अनेकदा हे कडू घोट स्वकीयांना पाजले आहेत. जाहीरपणे कान उपटले आहेत. नरसिंह राव, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी इतकेच काय, पंतप्रधान मोदी यांनीही वेळोवेळी पक्षातील तरुणांचे कान उपटले आहेत. शरद पवारांनी देखील त्या भूमिकेतून मत मांडली असतील. तर लेगेच इतरांच्या जिवाची घालमेल होण्याचं कारण नाही, असं संजय राऊत म्हणाले. पार्थ पवार नाराज आहेत की नाही ते त्यांच्या कुटुंबाला, पक्षाला माहिती असेल, असं देकील संजय राऊत म्हणाले.

तरुण राजकीय कार्यकर्ते हे वेगवान असतात. कोणताही विचार न करता निर्णय घेत असतात. मात्र, शरद पवार यांच्या कार्यकाळातील नेते सावकाश पावले टाकतात, असं संजय राऊत म्हणाले. पार्थ पवार यांच्या जुन्या पत्राचा राजकीय पक्षांकडून वापर होत आहे. भाजपनं पक्षांतर्गत विषय बघावेत, इतर पक्षात डोकावू नये, असा सल्ला संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे.