चंद्रकांत पाटलांनी चष्म्याचा नंबर तपासून प्रतिमेची काळजी घ्यावी, संजय राऊतांचा पलटवार

महाराष्ट्रातील राज्य उत्तम प्रकारे चालले आहे. मुंबई बँकवरही महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. हळूहळू सर्व संस्थांवर महाविकास आघाडीचा कब्जा राहील असे राऊत म्हणाले आहेत.

sanjay raut slams bjp leader chandrakant patil over cm pm meeting
चंद्रकांत पाटलांनी चष्म्याचा नंबर तपासून प्रतिमेची काळजी घ्यावी, संजय राऊतांचा पलटवार

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी चश्म्याचा नंबर तपासला पाहिजे. त्यांनी त्यांच्या प्रतिमेची काळजी घेत आगामी निवडणुकीच्या तयारीला लागले पाहिजे असे प्रत्युत्तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र डागलं होते. यावर राऊतांनी घणाघात केला आहे. देशात कोणते राज्य व्यवस्थित असेल तर ते महाराष्ट्र आहे. चंद्रकांत पाटील आणि भाजपला टीका करण्यापेक्षा दुसरं काही काम नाही त्यामुळ ते टीका करत असतात. चंद्रकांत पाटलांच्या चष्म्याचा नंबर तपासण्यासाठी आरोग्य पथक पाठवण्याबाबत विचार करणार असल्याचेही राऊत म्हणाले.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी राऊत म्हणाले की, या देशात कोणते राज्य व्यवस्थित असेल तर ते महाराष्ट्र आहे. चंद्रकांत पाटील असती किंवा भाजपचे अन्य नेते असतील त्यांच्या चष्म्याचा नंबर तपासावा लागेल. आमचे जे डॉक्टर लहाने नेत्रतज्ञ आहेत. त्यांचे एक पथक भाजप कार्यालयात पाठवता येईल का ते विचारायचे आहे. त्यांना श्रवण यंत्रही वाटप करायचे आहे. शिवसेना असे शिबीर घेत असतात कोणाला गरज असेल तर तसे उपचार आम्ही करु त्यांच्यावर. महाराष्ट्रातील राज्य उत्तम प्रकारे चालले आहे. मुंबई बँकवरही महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. हळूहळू सर्व संस्थांवर महाविकास आघाडीचा कब्जा राहील असे राऊत म्हणाले आहेत.

चंद्रकांत पाटील सज्जन गृहस्थ

चंद्रकांत पाटील सज्जन गृहस्थ आहेत. निरागस, निष्पाप आणि निषकपट आहेत. त्यांनी त्यांच्या पुढच्या निवडणुकीची तयारी करावी. आता इकडे तिकडे उगच तडमडू नये त्यांनी त्यांच्या प्रतिमेला जपावं असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री बैठकीला उपस्थित राहिले नाही राऊत म्हणतात..

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना परिस्थितीचा आढावा बैठकीला उपस्थित राहिले नाही यावर राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री नाही हजर राहिले कधी काळी पंतप्रधान नरेंद्र मोदीही बैठकीला उपस्थित राहू शकत नाहीत. असे काही नसते काही वेगळी कामे निघू शकतात ज्यांच्याकडे सूत्र आहेत त्या विभागाचे ते आरोग्यमंत्री राजेश टोपे स्वतः उपस्थित होते. तुम्ही आमच्या आरोग्यमंत्र्यांना कमी लेखता का ते सगळं सूत्र सांभाळत असतात.


हेही वाचा : पंतप्रधानांच्या कोरोना परिस्थिती आढावा बैठकीत बोलण्याची संधी दिली नाही, राजेश टोपेंनी पत्राद्वारे दिली माहिती