घरताज्या घडामोडीराजकारणात सांगायचे तर हमाम मे सब नंगे, पवारांवरील टीकेवरुन राऊतांचा भाजपवर निशाणा

राजकारणात सांगायचे तर हमाम मे सब नंगे, पवारांवरील टीकेवरुन राऊतांचा भाजपवर निशाणा

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी भाजपवर अनेक आरोप केले आहेत. तर भाजपने राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यावरील आरोप तसेच केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापरावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे. शरद पवारांवर आरोप करणाऱ्या भाजप नेत्यांना लाज वाटली पाहिजे अशा शब्दात संजय राऊतांनी भाजपला सुनावलं आहे. राजकारणात सांगायचे तर हमाम मे सब नंगे होते है असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपवर हल्लाबोल केला आहे. संजय राऊत म्हणाले की, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करणं महाराष्ट्रात यापूर्वी झाले नव्हते. ही महाराष्ट्राच्या राजकारणाची परंपरा नाही. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर आरोप करण्यात येत आहे. भाजपच्या लोकांना लाज वाटली पाहिजे आपल्या राजनैतिक गैरव्यवाहारांचा हिशोब करण्यामध्ये पवारांचे नाव घेत आहेत. दाऊदचे नाव घेत आहेत. राजकारणाबाबत सांगायचे तर हमाम मे सब नंगे होते है असा सूचक इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.

- Advertisement -

केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईवरुन महाराष्ट्रात अपु गांजाची शेती पिकत असल्याचे देशाला वाटत आहे. मलिकांच्या जावयावर खोटा गुन्हा दाखल केला होता. त्यांच्या कुटुंबीयांना त्रास झाला. केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन महाविकास आघाडीतील नेते, मंत्री त्यांना ज्या प्रकारे त्रास दिला जात आहे. असे प्रकार कधीच झाले नाही. ही महाराष्ट्राची परंपरा कधीच नव्हती. राजकीय विरोधकांना आशाप्रकारे संपवण्याचे काम कधीच झाले नाही. शरद पवारांवरसुद्धा घाणेरड्या पद्धतीने चिखलफेक करण्यात आली. भाजपने त्यासंबंधांत खुलासा करणे गरजेचे आहे. हे अधिकृत मत आहे का?, फडणवीसांनी याबाबत बोलायला हवे. ज्यांनी राजकारणात ५० पेक्षा जास्त वर्ष काढले आहेत. तयांच्यावर आरोप करणं हे महाराष्ट्र सहन करणार नाही. आम्ही अजून संयम बाळगला आहे. असे संजय राऊत म्हणाले.


हेही वाचा : १०० कोटी वसुली प्रकरण: ‘नॉट रिचेबल’ माजी गृहमंत्री अनिल देशमुख ED कार्यालयात दाखल

- Advertisement -

 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -