आरोग्य मंत्र्यांना कमी लेखता का?, पंतप्रधानांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवरुन राऊतांचा भाजपला सवाल

मुख्यमंत्री काही कारणास्तव अनुपस्थित होते पंरतु आरोग्यमंत्री राजेश टोपे बैठकीला उपस्थित होते. तुम्ही आरोग्य मंत्र्यांना कमी लेखता का? असा सवालही संजय राऊत यांनी केला आहे.

sanjay raut slams bjp over rajesh tope present pm narendra meeting and cm uddhav thackeray absence
आरोग्य मंत्र्यांना कमी लेखता का?, पंतप्रधानांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवरुन राऊतांचा भाजपला सवाल

देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली होती. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गैरहजर होते. परंतु त्यांच्या ऐवजी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे उपस्थित होते. यावरुन भाजपच्या नेत्यांनी टीकास्त्र डागलं आहे. संजय राऊतांनी भाजप नेत्यांना थेट सवाल करत राज्यातील कारभार सुरळीत सुरु असल्याचे सांगितले आहे. मुख्यमंत्री काही कारणास्तव अनुपस्थित होते पंरतु आरोग्यमंत्री राजेश टोपे बैठकीला उपस्थित होते. तुम्ही आरोग्य मंत्र्यांना कमी लेखता का? असा सवालही संजय राऊत यांनी केला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपवर घणाघात केला आहे. मुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोरोना परिस्थितीवरील आढावा बैठकीला गैरहजर होते. यावर राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री नाही हजर राहिले कधी काळी पंतप्रधान नरेंद्र मोदीही बैठकीला उपस्थित राहू शकत नाहीत असे काही नसते, काही वेगळी कामे निघू शकतात ज्यांच्याकडे सूत्र आहेत त्या विभागाचे ते आरोग्यमंत्री राजेश टोपे स्वतः उपस्थित होते. तुम्ही आमच्या आरोग्यमंत्र्यांना कमी लेखता का? ते सगळं सूत्र सांभाळत असतात असे संजय राऊत म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री का गैरहजर होते त्याच्यावर मुख्यमंत्री सचिवालय खुलासा करेल. भाजप टीका करत आहेत. त्यांच्याकडे टीका करण्याशिवाय दुसरे काय आहे? खरं म्हणजे भाजपने चीन जे आतमध्ये घुसले आहे त्याच्यावर बोलले पाहिजे. सीमेवर गंभीर परिस्थिती आहे. भारत पाकिस्तानवर रोज बोलताय कधीतरी भारत चीनवर टीका करा आणि बोला असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.

मुख्यमंत्र्यांनी कोणाकडेतरी पदाचा चार्ज द्यावा – पाटील

जर अशी तब्येतीची स्थिती असेल तर त्यांनी कोणाकडे मुख्यमंत्री पदाचा चार्ज दिला पाहिजे. त्याचे कारण खूप विषय महाराष्ट्राचे असतात. कालची बैठक फार महत्त्वाच होती. या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपेंना आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पाठवले. देशाच्या सर्व राज्यांचे मुख्यमंत्री असताना आपल्या राज्याच्या आरोग्यमंत्र्यांना बोलण्याचा वाव मिळणार नाहीच. परंतु मुख्यमंत्री असते तर बोलण्याची संधी मिळाली असती कारण तुमचे जवळचे संबंध आहेत. चार वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात उद्धवजी तुमचे काय मत आहे. पण तुम्ही तब्येतीमुळे जाऊ शकला नाही. तब्येतीबाबत हेटाळणी कधीही नाही आपल्या संस्कृतीविरोधी वर्तन करणार नाही असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.


हेही वाचा : माझी दृष्टी तपासण्यासाठी नेतृत्व आणि संघ समर्थ, चंद्रकांत पाटलांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर