घरताज्या घडामोडीTripura Violence: देशात अस्थिरता निर्माण करुन भाजपला २०२४च्या निवडणूकीत उतरायचे आहे...

Tripura Violence: देशात अस्थिरता निर्माण करुन भाजपला २०२४च्या निवडणूकीत उतरायचे आहे – संजय राऊत

Subscribe

त्रिपुरात घडलेल्या घटनांचे तिथल्या परिस्थितीची आम्हाला देखील चिंता आहे.

त्रिपुरातील हिंसाचाराच्या कथित घटनेचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले. त्रिपुरातील घटनांचे भांडवल करुन अमरावती,नांदेड आणि मालेगाव या तीन जिल्ह्यांमध्ये मोठ्या संख्येने मोर्चे निघाले दरम्यान दगफेक देखील करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. त्रिपुरातील घटनेवरुन महाराष्ट्रात दगफेक आणि मोर्चे काढण्याचे काहीच कारण नव्हते. मात्र देशात अस्थिरता निर्माण करुन भाजपला २०२४च्या निवडणूकीत उतरायचे आहे असा गंभीर आरोप राऊतांनी केला. त्रिपुरात राबवण्यात आलेली धोरणे आणि घेतलेली भूमिका भाजपने घेतली आहे आणि त्यामुळे देशात अशांतता आणि अस्थिरता निर्माण झाली आहे. देशात अस्थिरता निर्माण करु त्यांनी निवडणूका लढायच्या असल्याचे राऊतांनी म्हटले.

संजय राऊत पुढे म्हणाले, त्रिपुरात घडलेल्या घटनांचे तिथल्या परिस्थितीची आम्हाला देखील चिंता आहे. परंतु त्रिपुरात घडलेल्या घटनेवरुन महाराष्ट्रात दगडफेक करण्याचे काही कारण नव्हते. महाराष्ट्रात सर्व धर्म,सर्व जातींचाविषयी सद्भावना आहेत. त्रिपुरातील परिस्थितीची आम्हाला चिंता असल्याचे राऊत यांनी म्हटले.

- Advertisement -

मालेगाव तसेच अमरावती नांदेड त्याचप्रमाणे आता यवतमाळमध्ये देखील अनेक दुकानांची तोडफोड करण्यात आली. अमरावतीत जवळपास २०-२२ दुकांनाची तोडफोड झाली. नांदेडमध्ये देखील आंदोलकांकडून दगफेक करण्यात आली ज्यात दोन पोलीस जखमी झाले आहेत. त्रिपुरातील घटनांच्या निषेधार्थ मालेगावमध्ये काढण्यात आलेल्या मार्चोने हिंसक वळण घेतले आणि काही तासांत त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटले.

- Advertisement -

अशा परिस्थिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देखील राज्यातील जनतेचा शांतात बाळगावी, कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता संयमाने वागण्याचे असे आवाहन केले आहे. यात जे कोणी दोघी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे गृहमंत्र्यांनी म्हटले आहे.

 


हेही वाचा – त्रिपुरातील घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेला शांतता राखण्याचे गृहमंत्र्यांचे आवाहन

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -