ईडी, सीबीआय, वादळ, संकटाला शिवसेना घाबरत नाही, संजय राऊतांचे भाजपवर टीकास्त्र

मुख्यमंत्र्यांच्या चांगल्या कामामुळे विरोधकांच्या पोटात मळमळ होत असेल तर त्यावर ईलाज नाही

sanjay raut on chhagan bhujbal in Nandgaon also supports Kande's role

महाराष्ट्रात शिवसेनेची लाट कायम असून मुंबई महानगरपालिकेवर भगवाच फडकेल असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. ईडी, सीबीआय, वादळ, संकटाची शिवसेना पर्वा करत नाही. संपुर्ण मुंबईच आपला बालेकिल्ला आहे परंतु महाराष्ट्रात शिवसेनेचं स्वबळावर सरकार येईल असे स्वप्न पाहणं सच्चा शिवसैनिकाचे कर्तव्य आहे आणि यासाठी सगळ्यांनी कामाला लागले पाहिजे असे वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. शिवसेनेच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या चांगल्या कामामुळे विरोधकांच्या पोटात मळमळ होत असेल तर त्यावर ईलाज नाही अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे. पाऊस येतो-जातो पण शिवसेनेची लाट कायम असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत विक्रोळीतील कन्नमवारनगरमधील ४११ घरांच्या चावी वाटप कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी संजय राऊत यांनी विरोधकांवर चांगला निशाणा साधला आहे. पाऊस येतो -जातो परंतु शिवेसेनेची लाट कायम असल्याचे म्हणत मुख्यमंत्र्यांच्या कामामुळे जर विरोधकांच्या पोटात दुखत असेल तर त्यावर ईलाज नाही अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे.

खासदार संजय राऊत यांनी यावेळी म्हटलं आहे की, आदित्य ठाकरेंच्या प्रेरणेतून गिरणी चाळीचा प्रकल्प उभारला जातोय, वर्षानुवर्षे त्या ठिकाणी लोकं कसे राहत आहेत आपण पाहिले आहे. आता संपुर्ण प्रकल्प आपण नव्याने उभारतो आहे. हे काम यापुर्वी झाले नाही. आपले मुख्यमंत्री अल्यामुळे ही कामे होत आहेत. असं काम करणाऱ्याच्या पाठिशी महाराष्ट्रातील जनतेचे आशिर्वाद असतात त्यामुळे कोणी किती काढ्या लावल्या तरी सरकारचे काहीही वाकडे होणार नाही असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

भगवा कायम फडकलेला असेल

मुंबई महानगरपालिका निवडणुका आल्या आहेत. त्याही येतील जातील आपला भगवा कायम फडकलेला असेल आणि ईशान्य मुंबई आपले बालेकिल्ला आहे. सर्वच्या सर्व जागा जिंकायच्या आहेत. फक्त आणि फक्त शिवसेनेची सत्ता महापालिकेत स्वबळावर आणायची आहे आणि स्वबळाची तयारी आपल्याला इथूनच करायची आहे. कधीतरी महाराष्ट्रात फक्त शिवसेनेची सत्ता यावी असे आपले स्वप्न पाहणं सच्चा शिवसैनिकाचे कर्तव्य आहे. सगळे कामाला लागले आहेत.

विरोधी पक्षनेत्यांना एक चावी द्या

शिवसेना काय करत आहे असा प्रश्न नेहमी विरोधी पक्ष विचारत असतो तर त्यांना यातील एक चावी दिली पाहिजे. ४११ चाव्या घरांना देत असताना त्यात एका चावीची वाढ करुन विरोधी पक्षनेत्यांना द्या असा खोचक टोला राऊत यांनी लगावला आहे. यामुळे शिवसेना काय काम करते हे त्यांना समजेल असेही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात काम करण्याची चावी आपल्या मुख्यमंत्र्याकडे आहे. कोणतेही काम राहणार नाही. कोणते काम थांबणार नाही या राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कष्टकाऱ्यांच्या कामांना गती देणारे सरकार चालवत आहेत. या देशात ३२ राज्ये आहेत परंतु पहिल्या पाचमध्ये कामाच्या बाबतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. याचे कारण इथे राजकारण होत नाही तर समाजकारण होत आहे. हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मंत्र असल्याचे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

कोणाच्या पोटात दुखत असल्यास ईलाज नाही

शिवसेनेची काम काय असतात ते आपले शिवसेना प्रमुख सांगून गेले आहेत. मानवता हाच खरा धर्म आहे. आणि शिवसेना कसा पाळतो आहे ते सगळ्यांना पावलो पावली दिसतो आहे. देशात महाराष्ट्राची मान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कामामुळे गेलं आहे. यामुळे कोणाच्या पोटात जळजळ मळमळ होत असेल तर होऊ द्या त्याला ईलाज नाही. आज महाराष्ट्रात आणि देशातसुद्धा याच कामाच्या माध्यमातून भगवा फडवण्याचे वातावरण निर्माण झाल आहे.

दिल्लीत शिवसेनेच्या कामाबाबत चर्चा

दिल्लीत वारंवार शिवेसेनेवर चर्चा केली जाते आणि त्यावेळी ते मला विचारतात की शिवसेनेच्या यशाचे रहस्य काय आहे? आता परत चर्चा झाल्यास त्यांना सांगेल की, ह्या ४११ चाव्या आहेत त्याच यशाची चावी आहे. महाराष्ट्रात नाही तर प्रत्येक ठिकाणी शिवसैनिक काम करत आहे ती यशाची चावी आहे. महाराष्ट्रात जिथे जिथे शिवसेना काम करत आहे. कार्य करत आहे त्या प्रत्येक ठिकाणी शिवसैनिक चांगल्या प्रकारे काम करत असतो यामुळे शिवसेना वादळामध्ये, संकटामध्ये, ईडी असो, सीबीआय असो आम्ही परवा करत नाही आम्ही काम करतो आणि आम्ही इथे उभे आहोत आमच्या पायावर ते आमच्या कामाच्या कार्याच्या जोरावर आहोत असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांच्या कार्यालयावर आयकरचा विभागाचा छापा, मुंबईतील कार्यालयावर धाड