कोल्हापुरातून पळ काढलेल्या पाटलांना कोथरूडच्या जागेसाठी तोंडाला फेस आला होता, राऊतांचा घणाघात

चंद्रकांत पाटलांच्या मुखातून भाजपची लक्तरे लोंबत असतात - संजय राऊत

Petrol Diesel Price sanjay raut slams bjp over petrol diesel price drop
Petrol Diesel Price: पोटनिवडणूकीतील पराभवामुळे इंधन दर कपातीचा निर्णय, संजय राऊतांचा केंद्रावर निशाणा

कोल्हापूरात राष्ट्रवादी नेते हसन मुश्रीफ यांचे वजन आहे. भाजपचा सुपडा साफ झाला आहे. यामुळे चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरातून पळ काढत पुण्यात विधानसभा निवडणूक लढवली. यावेळी विजय मिळवताना पाटलांच्या तोंडाला फेस आला होता असा घणाघात शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मुखातून भाजपची लक्तरेच लोंबत असतात अशी खोचक टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर विरोधकांकडून ईडी आणि सीबीआयच्या कारवाईवरुन देण्यात येणाऱ्या धमक्यांवरुन संजय राऊतांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप करण्यात आल्यावर काँग्रेसच्या नेत्यांना दिलेला इशारा आणि चंद्रकांत पाटलांना गांभीर्याने घेत नाही असेही संजय राऊत यांनी अग्रलेखात म्हटलं आहे. भाजप नेत्यांनी केंद्रीय यंत्रणेला बदनाम केलं असल्याचे संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, मुश्रीफ हे मंत्री आहेत व कोल्हापुरात त्यांचे राजकीय वजन आहे. कालच्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरात भाजपचा सुपडा साफ झाला व चंद्रकांत पाटील यांना कोल्हापुरातून पळ काढून कोथरुडला जाऊन निवडणूक लढवावी लागली. कोथरुडला विजय मिळविताना पाटलांच्याही तोंडाला तसा फेसच फेस आला होता. निवडणुकांच्या आखाडय़ात हे व्हायचेच असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

चंद्रकांत पाटलांच्या मुखातून भाजपची लक्तरे

ईडी आणि सीबीआयच्या कारवाईवरुन संजय राऊत यांनी अग्रलेखात म्हटलं आहे की, एखाद्या मंत्र्याने वा घटनात्मक पदावरील व्यक्तीने काही चुकीचे काम केले असेल तर राज्यात त्याबाबत कायदेशीर दखल घेणारी यंत्रणा आहे. पोलीस, लाचलुचपत प्रतिबंधक खाते, आर्थिक गुन्हे शाखा, लोकायुक्त त्यासाठी आहेत; पण विरोधी पक्ष थेट ‘ईडी’ व ‘सीबीआय’च्याच बाता मारतात! चंद्रकांतदादा हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत याचे भान तरी त्यांनी ठेवावे, पण चंद्रकांतदादांचे वागणे, बोलणे व फुकाचे डोलणे राज्यात कोणीही गांभीर्याने घेत नाही. त्यांच्या मुखातून भाजपची लक्तरेच लोंबत असतात. एकतर ते ‘ईडी’, ‘सीबीआय’सारख्या संस्थांना बदनाम करीत आहेत.

या संस्थांवरचा लोकांचा विश्वास उडेल असे त्यांचे वर्तन आहे. दुसरे एक गंभीर विधान पाटलांनी केले. सध्याच्या सरकारकडे पैसे खाण्याचेसुद्धा स्किल नाही. पाटील म्हणतात तसे हे स्किल माजी मंत्री म्हणून त्यांच्याकडे आहे व याबाबतची ‘पीएच.डी.’ त्यांनी केली असावी. त्यामुळे ‘ईडी’ने पाटील व इतर माजी मंत्र्यांच्या पैसे खाण्याचा हिशेब एकदा घ्यायला हवा व आधीच्या सरकारातील मंत्र्यांच्या तोंडास फेस आणायला हवा असा इशारा संजय राऊत यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : सोमय्यांवरील कारवाईबाबत महाविकास आघाडीत बेबनाव