घरताज्या घडामोडीबेळगाव महाराष्ट्राचं की नाही ते आधी स्पष्ट करा’, राऊतांचं फडणवीसांना थेट आव्हान

बेळगाव महाराष्ट्राचं की नाही ते आधी स्पष्ट करा’, राऊतांचं फडणवीसांना थेट आव्हान

Subscribe

जर एखाद्याचा पराभव झाला तर मराठी माणसाचा पराभव झाला असे नाही.

बेळगाव महापालिकेत भाजपने ३६ जागांवर विजय मिळवून एकहाती सत्ता मिळवली आहे. बेळगावमधील महाराष्ट्र एकिकरण समितीचा पराभव झाल्यामुळे संजय राऊत यांनी भाजपवर चांगलीच टीका केली होती. बेळगावच्या निवडणुक निकालावरुन महाराष्ट्रात चांगलेच राजकारण तापलं होते. बेळगावमधील पराभव मराठी माणसाचा नाही तर संजय राऊत यांच्या अहंकाराचा असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. फडणवीसांनी केलेल्या टीकेला शिवसेना नेते संजय राऊत यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. महाराष्ट्र भाजपाने फालतू गप्पा मारू नयेत बेळगाव महाराष्ट्राचं की नाही ते आधी स्पष्ट करा असा सवाल संजय राऊत यांनी भाजपला केला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत यांनी ट्विट करत फडणवीसांवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र भाजपाने फालतू गप्पा मारू नयेत. बेळगाव महाराष्ट्राचेच आहे की नाही एवढेच त्यांनी आज स्पष्ट करावे..तो कुणाचा काय अहंकार हे नंतर बघू. मराठी एकजुटीचा बेळगावात विजय झालाच पाहिजे असे बोलणे हा अहंकार की मराठी अस्मिता हे 11 कोटी मराठी जनतेलाच ठरवू द्या असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

संजय राऊतांचा भाजपला सवाल

संजय राऊतांनी बेळगावरुन भाजपला खडेसवाल केले असून दोन अपेक्षा सांगितल्या आहेत. 1)बेळगावातील विजयी मराठी उमेदवारांना मुंबईतील हुतात्मा स्मारका समोर डोके टेकून महाराष्ट्र अस्मितेची शपथ घ्यायला लावा 2)बेळगाव पालिकेत महाराष्ट्र त विलीन होण्या बाबत दोन ओळींचा ठराव मंजूर करा, असं आव्हान संजय राऊत यांनी भाजपला दिलं आहे.

- Advertisement -

फडणवीस काय म्हणाले होते?

बेळगावमध्ये मराठी माणसाचा पराभव झाल्यावर भाजपने महाराष्ट्रात पेढे वाटले होते. यावर संजय राऊतांनी भाजपला खडेबोल सुनावले होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्त देताना म्हटलं आहे की, बेळगावात संजय राऊत यांच्या अहंकाराचा पराभव झाला आहे. मराठी माणसाचा पराभव कोणी करु शकत नाही. भाजपच्या नगरसेवकांमध्ये १५ पेक्षा अधिक नगरसेवक मराठी आहेत. यामुळे जर एखाद्याचा पराभव झाला तर मराठी माणसाचा पराभव झाला असे नाही. अशा शब्दात फडणवीस यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -